

पणजी : गोव्यात आता दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एक वर्ष आयटीआय केल्यास दहावी उत्तीर्ण व दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्णच्या समान धरले जाईल. त्याचबरोबर सरकारी नोकरीसाठी अशा उमेदवारांना संधी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. CM Pramod Sawant
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पर्वरी येथील नव्या इमारतीचे उद्घाटन आज (दि.१८) सकाळी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दाजी साळकर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. CM Pramod Sawant
गोवा शिक्षण मंडळ बाह्य शिक्षणाची (एक्सटर्नल) सुविधा देणार आहे. तालुकावार शाळा निश्चित करून मंडळाने या सुविधा द्याव्यात. गोव्याबाहेरील बोगस शिक्षण संस्थाना आळा घालण्यासाठी ही सुधारणा गरजेची आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
हेही वाचा