म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीत हळर्णकर एज्युकेशन सोसायटीला 2125 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड गोवा गृहनिर्माण मंडळाने वसाहतीच्या मूळच्या मास्टर प्लानमध्ये नियमबाह्य पद्धतीने दुरुस्ती करून उपलब्ध करून दिला आहे. याप्रकरणी गृहनिर्माण मंडळाविरूध्द कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीमधील मिनी सॅटलाईट टाऊनशिप रेसिडेंट्स असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
नियमभंग करून मूळच्या मास्टर प्लानमध्ये बदल, दुरुस्ती केल्याप्रकरणी असोसिएशनने ही याचिका दि. 4 फेब्रुवारी रोजी खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेत गोवा राज्य गृहनिर्माण खाते, कोलवाळ पंचायत, उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरण, हळर्णकर एज्युकेशन सोसायटी, गजानन खोर्जुवेकर व नीळकंठ हळर्णकर यांना प्रतिवादी केलेले आहे.
हेही वाचलंत का?
न्यायालयात याचिका दाखल करण्याचा हा प्रकार प्रकाशझोतात येण्याचा 'स्टंट' आहे. काहीजणांना प्रसिद्धीत येण्यासाठी उगाच एखादे प्रकरण उरकून काढण्याची सवय आहे
– नीळकंठ हळर्णकर, आमदार, थिवी