goa election : नरेंद्र मोदी म्हणाले, नेहरुंनी गोव्याला वाऱ्यावर सोडले | पुढारी

goa election : नरेंद्र मोदी म्हणाले, नेहरुंनी गोव्याला वाऱ्यावर सोडले

म्हापसा ; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसमुळे गोवा भारताबरोबर स्वतंत्र झाला नाही. काँग्रेसमुळेच गोव्याला पुढे पंधरा वर्षे स्वातंत्र्यासाठी झगडावे लागले. गोवा मुक्ती संग्राम संपविण्याचे काम काँग्रेसने केले. पंतप्रधान मंत्री पंडित नेहरु गोव्याला वाऱ्यावर सोडलं अशी खरमरीत टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. गोवा निवडणुकीच्या (goa election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी गोव्यात आले आहेत. यावेळी प्रचार सभेत त्यांनी काँग्रेसवर टिका केली.

म्हापसा येथील बोडगेश्वर मैदानावर पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पार पडली. या सभेआधी नरेंद्र मोदी यांनी म्हापशातील प्रसिद्ध बोडगेश्वर मंदिरात दर्शन देखिल घेतले. यावेळी मोदी म्हणाले, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनी लाल किल्ल्यावरुन सांगितले की, आम्ही गोव्याची मदत करु शकत नाही. त्यांनी गोव्याला कोणतीही मदत पाठवू नका असं सांगितले. म्हणजे याचा अर्थ सरळ होता की, तुमचं तुम्ही पाहून घ्या, आणि तुमचं तुम्ही मरा. काँग्रेसने गोवा मुक्ती संग्राम चळवळ संपवली. काँग्रेसमुळेच गोव्याला स्वंतत्र होण्यास विलंब झाला. गोव्याला नेहरुंनी वाऱ्यावर सोडलं असे म्हणत मग आज काँग्रेस गोव्याच्या जनतेकडून कशी काय मदत मागू शकते अशी विचारणा केली.

मोदी यांनी गोव्यातील भाजप सरकारचे कौतक करत म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री स्वत:ला मुख्यमंत्री नव्हे तर मुख्य मित्र म्हणून संबोधतता. ते स्वत:ला जनतेचे मित्र समजतात. मग गोव्याची जनता कोणाच्या पाठिशी उभे राहिल हे स्पष्ट आहे. भाजपने गोव्याला गुड गर्व्हनन्सकडे घेऊन गेले आहेत. गोव्याला भष्टाचार मुक्त राज्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बनवलं आहे. (goa election)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भाजपला मिळालेले मते ही गोवा साठी दिलेले मते आहेत. गोव्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दिलेलं मते आहेत. गोव्याच्या विकासासाठी दिलेली मते आहेत. गोव्याला गोल्डन गोवा बनविण्यासाठी दिलेली मते आहेत. त्यामुळे गोवा लवकरात लवकर गोल्डन गोवा होणार हे निश्चित.

भाजपने गोव्याचा विकास केला आहे. गोव्याचा विकास झाला नसता तर येथे पर्यटक आले असते का असा सवाल देखिल पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केला. भाजपने संपूर्ण गोव्याच्या विकासाचे स्वप्न पाहिले आहे. उत्तर गोव्याचा विकासाबरोबर दक्षिण गोव्याचा देखिल विकास होणार आहे आणि हे फक्त भाजपच करु शकतं. (goa election)

मोदी म्हणाले, आपण एका व्यक्तीचा पक्ष पाहिला आहे, आपण एका कुंटुंबाचा पक्ष पाहिला आहे. तसेच या पक्षाने सत्तेत असताना कोणता विकास केला हे देखिल पाहिले आहे. आता जनता या पक्षाला भूलणार नाही, ती विकासा सोबत आहे आणि विकास म्हणजे फक्त भाजप आहे. गोवेकर फक्त विकासलाच मतदान करणार आहेत.

यावेळी भावनिक होत नरेंद्र मोदी म्हणाले, माझी सुरुवात गोव्यातून झाली आहे. मला पहिल्यांदा भाजपचा प्रचार समितीचा प्रमुख गोव्यात करण्यात आलं. मला पंतप्रधान मंत्री पदाचा उमेदवार देखिल गोव्यातच करण्यात आले. म्हणून माजी सुरुवात गोव्यातूनच झाली आहे.

काँग्रेसमुक्त भारत या मोहिमेची सुरुवात देखिल गोव्यातूनच झाली आहे. गोवा ही प्रेरणा देणारी भूमी आहे. येथे आल्यावर नवी प्रेरणा नेहमीच मिळत असते. या ठिकाणी आल्यावर मला माझे मित्र मनोहर पर्रीकरांची नेहमी आठवण येते असे ते म्हणाले. यावेळी मोदी यांनी गोवन भाषेतून जनतेला भाजपला मदतदान करा असे आवाहन देखिल केले.

Back to top button