म्हापसा : लग्नाची नोंदणी करण्यास आलेल्या जोडप्यांची निराशा | पुढारी

म्हापसा : लग्नाची नोंदणी करण्यास आलेल्या जोडप्यांची निराशा

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : येथील उपनिबंधक कार्यालयात आज भलताच गोंधळ समोर आला आहे. यात उपनिबंधक कार्यालयात लग्नाची नोंदणी करण्यासाठी आलेल्या जोडप्यांची इंटरनेटचे सर्व्हर डाऊनने चांगलीच निराशा झाली.

याबाबतची अशी माहिती की, लग्नाची नोंदणी करण्यासाठी ज्यांना- ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली होती. अशी सगळी जोडपी सोमवारी (दि.७) रोजी म्हापसा येथील उप-निबंधक कार्यालयात आली होती. सकाळी ११ नंतर कामकाज सुरुवात होते. त्यामुळे काहीजण वेळेआधीच कार्यालयात येऊन थांबले होते. याच दरम्यान कामकाज सुरु झाले, पण संकेतस्थळावर सर्व्हर डाऊनमुळे काहीच करता येईना. यानंतर काही वेळ वाट बघून वैतागलेली जोडपी दुपारनंतर आपआपल्या घरी परतले.

राज्यभरात सर्वत्र लग्नाची नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळावर सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे आज ज्यांच्या लग्नाची नोंद होणार होती. त्यांची लग्ने तर रद्द झाली. पण आता कधी पुन्हा अपॉइंटमेंट मिळेल हे त्यांना माहिती नाही.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे अशा कार्यालयात सतत गर्दी होत असते. म्हापशाच्या कार्यालयातही अशी गर्दी झाली होती. पण येथे आलेल्या जोडप्यांना निराश होत घरी परतली आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button