गोवा : हणजूण येथे दहा विदेशी महिलांना अटक | पुढारी

गोवा : हणजूण येथे दहा विदेशी महिलांना अटक

हणजूण, पुढारी वृत्तसेवा: देशात राहण्याचा कोणताही वैध परवाना नसताना बेकायदेशीररीत्या वास्तव्य केल्या प्रकरणी हणजूण पोलिसांनी दहा विदेशी महिलांना अटक केली आहे. यात नऊ युगांडा व एक नायजेरियन नागरिक आहेत.

झर मुड्डी, हणजूण येथील एका स्थानिकाच्या घरात या सर्व महिला बर्‍याच काळापासून वास्तव्यास होत्या. या महिला बेकायदा कृत्यातही गुंतल्या असाव्यात, असा संशय येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. हणजूण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पारपत्र व वास्तव्याच्या कागदपत्रांची मागणी केली असता ते दाखवण्यासाठी त्या महिला असमर्थ ठरल्या.

यानंतर हणजूण पोलिसांनी सर्व दहा महिलांना विदेशी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button