गोवा: महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ह्रदयविकाराचा झटका

गोवा: महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ह्रदयविकाराचा झटका
Published on: 
Updated on: 

पणजी :पुढारी वृत्तसेवा :  पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना रविवारी (दि.२१)  रात्री ह्रदयविकाराचा झटका आला. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबूश यांना रविवारी (दि. 21) रात्री घरी असताना हृदयविकाराचा हलकासा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ गोमेकॉत हलविण्यात आले. तिथून त्यांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. याबाबतची अधिकृत माहिती बाबूश यांच्या पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news