नंदकुमार सातुर्डेकर
पिंपरी: जीआयएस मॅपिंग पीएमआरडीएच्या कामकाजात अतिशय उपयुक्त ठरत आहे आहे. विशेषतः सुनावणीदरम्यान लोक जे सांगतात त्याची सत्यता तपासता येत असल्याने हरकतदारांच्या मुद्द्यांची छाननी 'हा सूर्य हा जयद्रथ' या पद्धतीने करता येत आहे.
पुणे महानगर क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी पुणे शहर तालुका आणि हवेली तालुका यांचा संपूर्णपणे समावेश होतो तर मुळशी, मावळ, भोर, दौंड, खेड या तालुक्यांच्या काही भागाचा समावेश होतो. पुणे महानगर क्षेत्राचा विस्तार 7,253 चौरस किलोमीटर आहे.या क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम.आर.डी.ए.) या संस्थेची स्थापना केलेली आहे.
पुणे महानगर क्षेत्रामध्ये खालील संस्थांच्या हद्दीमध्ये पुणे महानगरपालिका,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे छावणी परिषद, खडकी छावणी परिषद, देहूरोड छावणी परिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद,सासवड नगरपरिषद,शिरुर नगरपरिषद, चाकण नगरपरिषद,राजगुरुनगर नगरपरिषद आणि लगतची सुमारे 865 गावे याचा समावेश होतो.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यांवर प्राप्त हरकती, सूचनांची सध्या सुनावणी सुरू आहे. हिंजवडी विकसन केंद्रातील 23 गावांतील हरकतीधारकांच्या सुनावणीचा कार्यक्रम सोमवारपासून (6 जून) सुरू झाला आहे. आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात या हरकती, सूचनांवर सुनावणी होत आहे.
पीएमआरडीएने 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर तब्बल 61 हजार हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत. सुनावणीसाठी सात जणांची महानगर नियोजन समिती तयार केली आहे. सूचना, हरकत सादर केलेल्या अर्जदारास सुनावणीबाबतचा सविस्तर तपशील टपालाद्वारे आणि लघुसंदेशाद्वारे कळविण्यात आलेले आहे. याबाबतचा सविस्तर तपशील पीएमआरडीएच्या ुुु.िाीवर. र्सेीं.ळप या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.जीआयएस मॅपिंग पीएमआरडीएच्या कामकाजात अतिशय उपयुक्त ठरत आहे आहे. विशेषतः सुनावणीदरम्यान लोक जे सांगतात त्याची सत्यता तपासता येत असल्याने हरकतदारांच्या मुद्द्यांची छाननी हा सूर्य हा जयद्रथ या पद्धतीने करता येत आहे.