अत्‍याचार करुन चिमुरडीचा खून, ‘खाकी’वर्दीही शहारली! ‘सॉरी डॉटर… ‘ ट्विट करत मागितली माफी

Kerala
Kerala
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माणूसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेनंतर केरळ पाेलीसही हादरले आहेत.  त्‍यांनी एक ट्विट करत निरागस चिमुरडीची माफी मागितली आहे. केरळ पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून शनिवारी (दि.२९ जुलै) या चिमुरडीला श्रद्धांजली देखील वाहिली (Kerala)आहे, असे असे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.

केरळ पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुली माफ कर! तुला सुरक्षितपणे तुच्या पालकांकडे परत आणण्याचे आमचे प्रयत्न व्यर्थ गेले, असे म्हणत केरळ पोलिसांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे. केरळ पोलिसांनी मल्याळम भाषेत माफीचे ट्विट (Kerala) केले आहे.

शुक्रवारी (दि.२८ जुलै) सकाळी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तत्‍काळ पाेलिसांनी शाेधमाेहिम राबवली. विशेष म्‍हणजे रात्रभर शोध मोहिम राबवली.  एर्नाकुलम जवळच्या अलुवा शहरातील स्थानिक बाजारपेठेमागील दलदलीच्या परिसरात पोत्यात या अल्पवयीन चिमुरडीचा मृतदेह (Kerala) आढळला. याप्रकरणी पोलिसांनी शोध घेतल्यानंतर एका व्यक्तीला अटक केली आहे.

अत्‍याचार करुन हत्या झालेली चिमुरडी बिहारमधील दाम्‍पत्‍याची मुलगी होती. शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत एका पोलीस अधिकाऱ्याने 'पीटीआय'ला सांगितले की, पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्‍याचार करण्‍यात आले. यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. या घटनेच्या दुसऱ्या एका दिवसानंतर शनिवारी (दि.३० जुलै) आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी बिहारमधीलआरोपी मजुराला अटक केली आहे. चिमुरडीचे कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका खोलीत हा नराधम राहत होता. सुरुवातीला आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याची चौकशी करणे आणि तपशील गोळा करणे पोलिसांना कठीण गेले. त्यानंतर शनिवारी त्याने गुन्ह्याची कबुली दिल्‍याचे पाेलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news