घाटमाथ्यावर फिरायला जात असाल तर सावधान !
पुणे : घाटमाथ्यावर फिरायला जात असाल तर सावधान. या भागात अतिमुसळधार पाऊस सुरू असल्याने दृश्यमानता कमी आहे. रस्ते खचून भूस्खलन होण्याचा धोका असल्याचा इशारा पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिला आहे. दरम्यान, मंगळवारी शहरात रिमझिम पाऊस पडला. दिवसभरात शहरात 1.5 मिमी पावसाची नोंद झाली.
मंगळवारी झालेला पाऊस (मिमी)
शिवाजीनगर : 1.6
पाषाण : 2.5
बालेवाडी : 1.5
वडगाव शेरी : 1
हडपसर : 1
कोरेगाव पार्क : 0.5
घाटमाथ्याला बुधवारी अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातून या भागात पावसाळी पर्यटनाला नागरिक मोठ्या संख्येने जात आहेत, त्यांच्यासाठी हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. या भागात पाऊस 150 ते 200 मि.मी.पेक्षा जास्त पडत आहे. त्यामुळे भूस्खलनाचा धोका आहे. या भागात फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन पुणे वेधशाळेने केले आहे. 4पान 4 वर
शहरात मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. पावसामुळे कात्रज भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील सर्व पेठा, उपनगर भागात पावसामुळे चिखल व डबकी तयार झाल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. शहरातील शिवाजी रस्ता, शनिवार पेठ, कोथरूड, कर्वे रस्ता, वाकडेवाडी, शिवाजीनगर, नगर रस्ता या भागातही रिमझिम पावसाने जागोजागी चिखल झाला आहे.
हेही वाचा :

