Nanded | आदमपुरात मुस्लिम कुटुंबास गणेश आरतीचा मान, एकोप्याचा दिला संदेश

Nanded adampur muslim family ganesh aarti | आदमपुरात मुस्लिम कुटुंबास गणेश आरतीचा मान, एकोप्याचा दिला संदेश
Nanded news
आदमपूरात मुस्लिम कुटुंबाने गणेशाची आरती केलीPudhari photo
Published on
Updated on

आदमपूर : बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील रहिवासी महमदरफी फकरूशा मदार आणि फक्रूशा पिरसाब मदार, कवी, गीतकार जाफर फक्रूशा आदमपूरकर यांना सामूहिक गणेश आरतीचा मान देण्यात आला.

आदमपूरकर यांनी सर्वधर्मसमभाव हा भाव नेहमीच उराशी बाळगला आहे. यांनी आदमपूर येथील बुरूड गल्लीतील विराजमान जय श्री राम गणेश मित्र मंडळाच्या गणपतीची रविवार दि.२० सप्टेंबर रोजी आरती केली.

Nanded news
Nanded Umari Black Sunday incidents| उमरीकरांसाठी काळा रविवार, एकाच दिवशी सहा हृदयद्रावक घटना, परिसरात हळहळ

सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे संपूर्ण गावातील रहिवासी नागरिकांचा उत्सव होय. सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या उत्सवाचा आनंद हा कालातीत असतो. एकीकडे काही भागात धार्मिक अराजकतेची तेढ निर्माण होत असताना या आरतीने धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला आहे.

Nanded news
Nanded Missing Youth Return|बापशेटवाडी येथील बेपत्ता झालेला तरुण तब्बल १४ वर्षांनी परतला!

अराजकता, धर्मभेदाच्या बाबींना फाटा देत एक भूतपूर्व पारंपरिक एकोप्याचा आदर्श या मंडळाने समाजापुढे ठेवला आहे. मुखोद्गत गणेश आरती अश्विन मठपती महाराज यांनी सादर केली.

यावेळी सामुहिक गणेश आरती कार्यक्रमास काशिनाथ हांद्रे मालीपाटील, मारोती कोलमवार, माणिकराव पाटील, विश्वनाथ मुंगडे, गंगाधर पंगलवार, थडीसावळी सरपंच शिवचंदन अनपलवार, विठ्ठल नागेश्वर, विश्वनाथ नाईक, नरसिंग नाईक, सुरेशराव हांद्रे, पुंडलिक नाईक, रामराव पांडे, अनिल वाघमारे, राजपाल चौहान, बालाजी नाईक, गोविंद नाईक, संजय नागेश्वर, बालाजी नागेश्वर, सचिन नाईक, बालाजी डोईफोडे, बालाजी सुनेवाड, शिवा डोईफोडे, अमोल नाईक, विनोद नाईक, बुरूड गल्ली परिसरातील महिला, मुले उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news