Kolhapur Ganesh Visarjan 2026 | कोल्हापुरात किरकोळ चेंगराचेंगरीचा प्रकार, रात्री १२ ला डॉल्बी शांत; यंदा विसर्जनला वेग

Kolhapur Ganesh Visarjan 2026 | कोल्हापुरात किरकोळ चेंगराचेंगरीचा प्रकार, रात्री १२ ला डॉल्बी शांत; यंदा विसर्जनला वेग
Kolhapur Ganesh Visarjan 2026
Kolhapur Ganesh Visarjan 2026 Pudhari photo
Published on: 
Updated on: 
Summary

गणेश विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण, रात्री 12 वाजता डॉल्बी बंद; आज सकाळी ९ वाजता शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन

इराणी खण येथे तब्बल २,९१९ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

विसर्जनासाठी महापालिकेचे सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचारी २५ तासांहून अधिक काळ कार्यरत

३५ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन, संकलित निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठविण्यात आले

कोल्हापूर : कोल्हापुरात यंदाचा सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडला. रात्री काही ठिकाणी चेंगराचेंगरीचा किरकोळ प्रकार घडला. मात्र पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवला शिवाय रात्री 12 वाजता सर्वच डॉल्बी बंद केले.

Kolhapur Ganesh Visarjan 2026
Kolhapur Ganesh Visarjan 2026 : गोखले कॉलेज गणेशमूर्ती दुर्घटनेवर महावितरणचा खुलासा, म्हणाले; ‘मूर्तीसोबत सुरुवातीपासून आमची टीम’

'पुढारी न्यूज'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजता इराणी खण येथे शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाली. यंदा इराणी खण येथे तब्बल २ हजार ९१९ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

यामध्ये सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या १ हजार ६३७ मोठ्या, तर १ हजार २८२ लहान गणेशमूर्तींचा समावेश आहे. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी शहरातील कृत्रिम विसर्जन कुंडांचाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वापर केला.

Kolhapur Ganesh Visarjan 2026
Kolhapur Ganpati Visarjan 2026 Live: वेताळ तालीम मंडळाची जल्लोषात मिरवणूक, गणेश मूर्तीचे महाद्वार रोडवर आगमन

विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेचे सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचारी २५ तासांहून अधिक काळ कार्यरत होते. इराणी खण येथे ४ क्रेन आणि १० फ्लोटिंग तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय १०० टेम्पो, ४०० हमाल, ५ जेसीबी, ७ डंपर आणि ६ ॲम्ब्युलन्ससह यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

दरम्यान, धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे ६०० सेवकांनी ३५ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन केले. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल महापालिका प्रशासनाने गणेश मंडळे, नागरिक, पोलीस प्रशासन आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news