Kolhapur Ganesh Visarjan 2026 : गोखले कॉलेज गणेशमूर्ती दुर्घटनेवर महावितरणचा खुलासा, म्हणाले; ‘मूर्तीसोबत सुरुवातीपासून आमची टीम’

‘सर्व कामे आधीच पूर्ण केली होती’
Kolhapur Ganesh Visarjan 2026 : गोखले कॉलेज गणेशमूर्ती दुर्घटनेवर महावितरणचा खुलासा, म्हणाले; ‘मूर्तीसोबत सुरुवातीपासून आमची टीम’
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोखले कॉलेज चौकात वाय. पी. पोवार नगर मंडळाची २१ फुटी बॅलेंसिंग गणेशमूर्ती कोसळल्याच्या घटनेनंतर महावितरणने खुलासा केला आहे. या दुर्घटनेत महावितरणचा कोणताही निष्काळजीपणा नसल्याचे महावितरणचे कोल्हापूर जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी स्पष्ट केले.

मिरवणुकीपूर्वी मुख्य मिरवणूक मार्गावरील महावितरणशी संबंधित सर्व आवश्यक कामे, तसेच पोलिस प्रशासनाने सूचित केलेली कामे आणि आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करण्यात आल्याचे महावितरणने म्हटले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महावितरणची २१ पथके, २४ अभियंते आणि २२५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

मूर्तीसोबत सुरुवातीपासून महावितरणची टीम

वाय. पी. पोवार नगर मंडळाची मूर्ती मंडळापासून गोखले कॉलेजपर्यंत नेली जात असताना महावितरणच्या पथकाने सुरुवातीपासून मदत केली. उद्यमनगर शाखेतील जनमित्र स्वप्नील जाधव, दीपक थोरवत, सूरज चव्हाण आणि दिग्विजय जांभळे हे मूर्तीसोबत उपस्थित होते, अशी माहिती महावितरणने दिली.

महावितरणच्या म्हणण्यानुसार, घटनेपूर्वीही मूर्ती सुरक्षितपणे मार्गस्थ करण्यासाठी पथकाकडून आवश्यक सहकार्य करण्यात आले होते. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार मूर्ती गोखले कॉलेज परिसरात पोहोचण्यापूर्वीच एका बाजूला झुकलेली होती.

वाय. पी. पोवार नगर मंडळाची ही बॅलेंसिंग मूर्ती विसर्जनासाठी नेत असताना गोखले कॉलेज चौकात अचानक कोसळली. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news