Solapur | गणेशोत्सवात उपद्रवींवर पोलिसांचा वॉच; शांततेला गालबोट लावणाऱ्यांवर बसणार लगाम

वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई; हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात
Police
PolicePudhari
Published on
Updated on

मोहोळ शहर (सोलापूर): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोहोळ पोलिसांनी कंबर कसली आहे. उपद्रवी तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरोधात प्रतिबंधक कारवाईचा धडाका सुरू करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२९ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली

Police
Shaktipeeth Expressway Land Acquisition: शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनासाठी १९५५ चा; तर नुकसान भरपाईसाठी २०१३ चा कायद्या लावणार?

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. गंभीर स्वरूपाच्या उपद्रवी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(२) अन्वये तात्पुरत्या हद्दपारीचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्याची तयारी पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात उपद्रव निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.

Police
Sand Auction : वाळू लिलावासाठी नवे आदेश जारी

दरम्यान, अवैध दारू विक्रीसह बेकायदा धंदे करणाऱ्या व्यक्तींविरोधातही पोलिस प्रशासनाकडून कठोर भूमिका घेण्यात येणार आहे. अशा व्यक्तींविरोधात दारूबंदी कायदा कलम ९३ अन्वये प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार आहेत.

गणेशोत्सव हा उत्साह, भक्ती आणि सामाजिक सलोख्याचा सण आहे. या उत्सवाच्या नावाखाली शांतता भंग करणारे अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश मोहोळ पोलिस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनीही अफवा, वादविवाद आणि कायदा हातात घेण्याचे प्रकार टाळून पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“प्रतिबंधक कारवाई अधिक तीव्र करणार”

“आगामी काळातही उपद्रवी व्यक्ती, वारंवार गुन्हे करणारे तसेच अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात प्रतिबंधक कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. नागरिकांनी गणेशोत्सव पारंपरिक, शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा.”

- दीपक पाटील, पोलिस निरीक्षक, मोहोळ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news