Sambhajinagar Ganeshotsav 2026 : उमेदच्या गणेशमूर्ती विक्रीतून ६ कोटी ३१ लाखांची उलाढाल

जिल्ह्यात २५३ स्टॉल; २ लाख ४१ हजार ५८ गणेशमूर्तीची विक्री
UMED Women Self Help Groups
Sambhajinagar Ganeshotsav 2026pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अंतर्गत 'उमेद'च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचतगटांसाठी राबविण्यात आलेल्या गणेशमूर्ती विक्री स्टॉलच्या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या २५३ स्टॉलमधून तब्बल दोन लाख ४१ हजार ५८ गणेशमूर्तीची विक्री झाली. या विक्रीतून ६ कोटी ३१ लाख ४३ हजार ९२७ रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर यांनी दिली.

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचतगट आणि स्वयंसहायता समूहांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांचे मार्केटिंग करणे, व्यवसायासाठी मार्गदर्शन करणे तसेच प्रदर्शनांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने केले जाते.

UMED Women Self Help Groups
Shalarth ID Scam : एसआयटीच्या रडारवर तब्बल ७४२ शाळा

गणेशोत्सवाच्या निमित्ताने याच उपक्रमाचा भाग म्हणून यंदा महिला बचतगटांना गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. १० ते १४ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत विविध ठिकाणी हे स्टॉल उभारण्यात आले होते. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पाच स्टॉल, तसेच मोठी गावे, कायम गर्दीचे रस्ते आणि ग्राहकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले होते.

शहरात जिल्हा परिषद मुख्यालयाच्या पाठीमागील मैदानावर तब्बल ३१ स्टॉल उभारण्यात आले होते. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांनी या स्टॉलला चांगला प्रतिसाद दिल्याने महिला बचतगटांच्या गणेशमूर्तीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दरम्यान स्वयंसहायता समूहातील महिलांनीही स्टॉलवर उपस्थित राहून गणेशमूर्तीची विक्री केली.

UMED Women Self Help Groups
Chhatrapati Sambhajinagar ST Bus : एसटीच्या टोल खर्चाला ब्रेकच नाही; पाच महिन्यांत २५ लाखांचा अतिरिक्त भार

यंत्रणेच्या नियोजनातून उपक्रम यशस्वी

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके यांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी, तर जिल्हा पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांनी स्टॉलच्या नियोजनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंत काम पाहिले. जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक बिभीषण भोईटे, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे, तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व तालुका अभियान व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news