Sabarmati Ashram : सल्लूभाईची साबरमती आश्रमातील गांधीगिरी

Sabarmati Ashram : सल्लूभाईची साबरमती आश्रमातील गांधीगिरी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : बाॅलिवूडचा सल्लूभाई अर्थात सलमान खान आपल्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'अंतिम : द फायनल ट्रूथ' चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अहमदाबाद येथे गेलेला होता. या दौऱ्यादरम्यान सलमानने महात्मा गांधी यांच्या प्रसिद्ध 'साबरमती आश्रम'लादेखील (Sabarmati Ashram) भेट दिली. या ठिकाणी सलमानने चरखादेखील चालवला. सलमान खानचे आश्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये सलमान खानने (Salman Khan) हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जिन्स घातलेली आहे. आश्रमातून (Sabarmati Ashram) बाहेर पडताना व्हिजीटर बुकवर आपला संदेशदेखील लिहिलेला आहे. त्यात सल्लूभाईने लिहिलं आहे की, "मला साबरमती आश्रमात येणं खूप चांगलं वाटलं. हा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. मला पहिल्यांदा या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. मला पुन्हा आश्रमला भेट देणं नक्की आवडेल", अशीही प्रतिक्रिया सलमानने आश्रमभेटीनंतर दिली आहे.

सलमान खाने ज्या चरख्यातून सूत कातले, त्या चरख्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासहीत कित्येक दिग्गजांनी सूत कातलेले आहे. आश्रमच्या व्यवस्थापकांनी आपल्या परंपरेनुसार सलमान खानला कापसाचा हार घालून स्वागत केले. सलमान खानने तो हार स्वतःच्या हातात बांधला.

सलमान खानचा 'अंतिम : द फायनल ट्रूथ' हा सिनेमा बाॅक्स ऑफिसवर चांगला गाजला आहे. यापूर्वी या सिनेमासंदर्भात नुकतीच एक बातमी आलेली होती की, महाराष्ट्रातील मालेगाव येथे सिनेमागृहात फटाके लावले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर दुसरा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. यामध्ये 'अंतिम : द फायनल ट्रूथ' या चित्रपटाच्या पोस्टरवर दूधाचा अभिषेक करताना सलमानचे चाहते दिसले होते.

सल्लूभाईने तो व्हिडिओ शेअर करत म्हटले की, "काही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांना पाणीदेखील मिळत नाही. आणि तुम्ही लोक अशा पद्धतीने दूध वाया घालवत आहात. माझी चाहत्यांना विनंती आहे की, जर तु्म्हाला दूध द्यायचं आहे तर एखाद्या गरिबाच्या पोराला द्या, ज्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही", असंही सलमान खानने म्हंटलं होतं.

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news