गोडसाखर निवडणुकीत मुश्रीफ पॅनेल आघाडीवर
गोडसाखर निवडणुकीत मुश्रीफ पॅनेल आघाडीवर

गडहिंग्लज गोडसाखर निवडणूक : मोठ्या मताधिक्याने मुश्रीफ पॅनेल आघाडीवर  

Published on

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत (गोडसाखर) पहिल्या फेरीअंती माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ व डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील छ. शाहू समविचारी आघाडीला मतदारांचा स्पष्ट कल दिसून येत आहे. सर्व गटांमध्ये या आघाडीचे उमेदवार हजारहून अधिक आघाडीवर आहेत. संस्था गटात आ. मुश्रीफ यांच्या छ. शाहू आघाडीचे सोमनाथ अप्पी पाटील यांनी आ. राजेश पाटील यांच्या श्री काळभैरव आघाडीचे उमेदवार व कामगार नेते शिवाजी खोत यांना १६२ मतांनी पराभूत केले आहे. खोत यांना ३७ मते मिळाली तर १ मत बाद झाले.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचीच दोन पॅनेल एकमेकासमोर उभी ठाकली होती. आ. हसन मुश्रीफ यांनी माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांना सोबत घेत छ. शाहू समविचारी आघाडी केली होती. या विरोधात चंदगडचे आ. राजेश पाटील, माजी आ. अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, कामगार नेते शिवाजी खोत यांच्या श्री काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीने टक्कर दिली.

पहिल्या फेरीअखेर १ ते ३४ केंद्रात आतापर्यंत मतमोजणी झाली. यामध्ये मिळालेली मते खालीलप्रमाणे –

कौलगे-कडगाव गट –

एकूण मतदान ७८४९, वैध ७६२६, अवैध २२३
डॉ. प्रकाश शहापूरकर (छ. शाहू आघाडी) ः ४९१३
बाळासाहेब देसाई (छ. शाहू आघाडी) ः ४५६६
विश्वनाथ स्वामी (छ. शाहू आघाडी) ः ४४२२
सुजित देसाई (काळभैरव आघाडी) ः २७६७
अशोक देसाई (काळभैरव आघाडी) ः २७४२
विकास पाटील (काळभैरव आघाडी) २५६२

गडहिंग्लज-हनिमनाळ गट –

एकूण मतदान ७८४९, वैध ७५५१, अवैध २९८
अशोक मेंडूले (छ. शाहू आघाडी) ः ४४५९
शिवराज पाटील (छ. शाहू आघाडी) ः ४४५०
अक्षयकुमार पाटील (छ. शाहू आघाडी) ः ४४०२
संग्रामसिंह नलवडे (काळभैरव आघाडी) ः २८७७
शिवाजी खोत (काळभैरव आघाडी) ः २७५५
विजयकुमार मोरे (काळभैरव आघाडी) ः २७२३
राजेंद्र तारळे (अपक्ष) ः २१०

भडगाव मुगळी गट –

एकूण मतदान ७८४९, वैध ७६७१, अवैध १७८
सतीश पाटील (छ. शाहू आघाडी) ः ४३९०
प्रकाश चव्हाण (छ. शाहू आघाडी) ः ४३०५
अमर चव्हाण (काळभैरव आघाडी) ः ३१६४
बाबासाहेब पाटील (काळभैरव आघाडी) ः २८२७

नूल-नरेवाडी गट –

एकूण मतदान ७८५३, वैध ७६४२, अवैध २११
सदानंद हत्तरकी (छ. शाहू आघाडी) ः ४७३९
रवींद्र पाटील (छ. शाहू आघाडी) ः ४६३४
वसंत चौगुले (काळभैरव आघाडी) ः २६७०
रणजित यादव (काळभैरव आघाडी) ः २५६१
प्रीतम कापसे (अपक्ष) ः १५३

महागाव-हरळी गट –

एकूण मतदान ७८५९, वैध ७६५०, अवैध २०९
विद्याधर गुरबे (छ. शाहू आघाडी) ः ४९५०
प्रकाश पताडे (छ. शाहू आघाडी) ः ४८४१
भरमू जाधव (छ. शाहू आघाडी) ः ४६३४
बाळकृष्ण परीट (काळभैरव आघाडी) ः २६६२
प्रदीप पाटील (काळभैरव आघाडी) ः २५८४
संदीप शिंदे (काळभैरव आघाडी) ः २५०४
सुरेश कुराडे (अपक्ष) ः ९६

महिला प्रतिनिधी –

एकूण मतदान ८०८६, वैध ७८७३, अवैध २१३
मंगल आरबोळे (छ. शाहू आघाडी) ः ४८८९
कविता पाटील (छ. शाहू आघाडी) ः ४८३८
शुभांगी देसाई (काळभैरव आघाडी) ः २७८५
गीता पाटील (काळभैरव आघाडी) ः २७२३
उर्मिला पाटील (अपक्ष) ः २८

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी –

एकूण मतदान ८०८५, वैध ७९१०, अवैध १७५
काशिनाथ कांबळे (छ. शाहू आघाडी) ः ५०११
परशुराम कांबळे (काळभैरव आघाडी) ः २८९९

इतर मागास प्रतिनिधी –

एकूण मतदान ८०८५, वैध ७८२०, अवैध २६५
दिग्विजय कुराडे (छ. शाहू आघाडी) ः ४७२५
संजय बटकडली (काळभैरव आघाडी) ः ३०३८
प्रवीण पोवार (अपक्ष) ः ५७

भटक्या जाती-जमाती प्रतिनिधी –

एकूण मतदान ८०८६, वैध ७८९८, अवैध १८८
अरुण गवळी (छ. शाहू आघाडी) ः ४९४०
संभाजी नाईक (काळभैरव आघाडी) ः २९५८

उत्पादक गट –

एकूण मतदान २३७, वैध २३६, अवैध १
सोमनाथ पाटील (छ. शाहू आघाडी) ः २३६
शिवाजी खोत (काळभैरव आघाडी) ः ०१

अद्याप दोन फेर्‍या मोजणीच्या बाकी आहेत. दरम्यान कल स्पष्ट होताच छ. शाहू आघाडीच्या उमेदवारांनी जल्लोष सुरु केला आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news