G-20 Summit
G-20 Summit

G-20 Summit: जी-२० परिषदेची सांगता; अध्यक्षपद ब्राझीलकडे सुपूर्द

Published on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: नवी दिल्ली संयुक्त जाहिरनामा एकमताने संमत केल्याच्या यशानंतर भारतातील महत्त्वाकांक्षी जी२० परिषदेची आज सांगता झालीजी२० परिषदेचे पुढील अध्यक्षपद ब्राझील भूषवणार असून, मावळते अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे अध्यक्षपदाचे प्रतिक असलेला वॉवेल सुपूर्द केलायावेळीभूक आणि दारिद्र्य याविरुद्ध संघर्षाला ब्राझीलचे सर्वोच्च प्राधान्य असेलअसे प्रतिपादन लुला दा सिल्वा यांनी केलेतर, "स्वस्ति अस्तु विश्वस्यया विश्वकल्याणाची आणि शांततेची कामना करणाऱ्या संस्कृत वचनाने परिषदेचा समारोप झाला. (G-20 Summit)

जी२० परिषदेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस होतानियोजनाप्रमाणे आज वन फ्यूचर (एक भविष्यया विषयावर सत्र झालेयाआधीची वन अर्थ (एक पृथ्वीआणि वन फॅमिली (एक कुटूंबया विषयांवरील दोन सत्रे काल झाली होतीआफ्रिकी समुहाला जी२० चे मिळालेले सदस्यत्व आणि नवी दिल्ली संयुक्त जाहिरनामा देखील जागतिक पातळीवरील सर्व नेत्यांनी एकमताने स्विकारणे ही पहिल्या दिवसाची ठळक वैशिष्ट्ये होतीयावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "सर्वांची सोबत आणि सर्वांचा विकासया मूलमंत्राने पुढे जाण्याचे आवाहन केले होते. (G-20 Summit)

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेनब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोचीनचे पंतप्रधान ली कियांगरशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि अन्य राष्ट्रप्रमुखांनी आज राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि आदरांजली अर्पण केलीत्यानंतर समारोप सत्र झाले. (G-20 Summit)

समारोप सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी२० च्या पुढील अध्यक्षपद तांत्रिक स्वरुपात ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्याकडे हस्तांतरीत केलेअर्थातब्राझीलच्या अध्यक्षीय जबाबदारीला १ डिसेंबर २०२३ पासून सुरवात होणार आहेतोपर्यंत जी२० चे अध्यक्षपद भारताकडेच राहणार आहेया अखेरच्या अडिच महिन्यांच्या कालावधीत जी२० चे आभासी अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलापंतप्रधान मोदी म्हणालेकी नोव्हेंबर अखेरपर्यंत जी२०च्या अध्यक्षपदाची जबबाबदारी भारताकडे आहेदोन दिवस चाललेल्या परिषदेमध्ये अनेक सुचना आणि प्रस्ताव समोर आलेत्यामुळे आलेल्या सूचनांची अंमलबजावणी प्रक्रिया गतीमान कशी होईल हे पहायला हवेयासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस जी२० शिखर परिषदेचे एक आभासी सत्र बोलावून याबाबतचा आढावा घेतला जावाअशी सूचना पंतप्रधान मोदींनी केलीतसेच "स्वस्ति अस्तु विश्वस्यया विश्वकल्याणाची आणि शांततेची कामना करणाऱ्या संस्कृत वचनाने परिषदेचा समारोप केला.

अध्यक्षपद स्विकारल्यानंतर राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा प्राधान्यक्रम सांगितलाभूक आणि दारिद्र्य याविरुद्ध वैश्विक आघाडी तयार करणे त्याचप्रमाणे पर्यावरण बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जगाला एकत्र आणणे यासाठी दोन कृती गट तयार करण्यात येतील असेही ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी स्पष्ट केलेमहात्मा गांधींच्या समाधीस्थळीच्या दर्शनाचा उल्लेख करताना ते भावूकही झाले होतेराष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी आपल्या राजकीय जीवनात महात्मा गांधींच्या आदर्शांना महत्त्व दिल्याचे सांगितलेअनेक दशके कामगार चळवळीत संघर्ष करताना आपण नेहमीच अहिंसेचे पालन केले आहेत्यामुळे महात्मा गांधींना आदरांजली वाहताना भावूक झाल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news