

पुढारी ऑनलाइन डेस्क : G20 Summit 2nd Day : G20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस असून आज सकाळी परिषदेसाठी आलेल्या सर्व राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधींनी सकाळी राजघाट येथे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी मोदी यांनी परिधान केलेला खादीचा पोषाख तसेच तिथे उभारलेल्या साबरमती आश्रमाच्या चित्राची चर्चा होत आहे.
भारत G20 चे यजमानपद भूषवत आहे. G20 परिषदेचे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेसाठी शुक्रवारपासून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी भारतात उपस्थित राहण्यास सुरुवात केली. काल शनिवारी (दि9) परिषदेचा पहिला दिवस होता. यावेळी कोणार्क मंदिराच्या उभारलेल्या भव्य चित्रकृती समोर उभे राहून सर्व नेत्यांचे स्वागत केले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह आणि इतर राष्ट्रप्रमुख आणि सरकार प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांनी एक मिनिटाचे मौन पाळले. महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी दिल्लीच्या राजघाटावर पुष्पहार अर्पण केला.
तर आज G20 च्या पाहुण्यांनी दिल्लीतील राजघाट येथे महात्मा गांधी यांना अभिवादन दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आंतरराष्ट्रीय प्रमुखांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी स्वतः खादीचा पोशाख परिधान केला आहे. तर पंतप्रधान मोदी जिथे उभे आहे. तिथे साबरमती आश्रमाचे भव्य चित्र उभारण्यात आले आहे. पंतप्रधान यांनी काल कोणार्कच्या सूर्यरथाच्या चक्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना भारतीय संस्कृती आणि तत्कालीन वैज्ञानिक प्रगतीचे दर्शन घडवले. त्यानंतर आज खादी आणि साबरमती आश्रमांच्या चित्रकृतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा आणखी जवळून परिचय करून दिला.