

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मागील काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांनी 50 टक्के सातवा वेतन आयोग पीएमपी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली होती, ती मागणी आता पुर्ण झाली असून, पुढच्या जुलै 2023 या महिन्यापासून संपूर्ण कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.
असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पीएमपी कर्मचाऱ्यांचे आणि अन्य विषयांसंदर्भात पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांची माहिती दिली.
हे ही वाचा :