

पुढारी ऑनलाइन डेस्क : 'India@75: India-UN Partnership in Action' : भारताची अर्थव्यवस्था 18 व्या शतकात जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या एक चतुर्थांश होती. मात्र, २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत गुलामगिरीमुळे जगातील गरीब देशांपैकी एक बनला, पण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी भारत जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपल्यासमोर अभिमानाने उभा आहे. एवढेच नाही तर आम्ही वेगाने पुढे जात आहोत. 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी यूएनमध्ये भारताच्या विकासाचा चढता आलेख मांडला.
न्यूयॉर्कमध्ये आयोजित 'India@75: India-UN Partnership in Action' कार्यक्रमाला संबोधित करताना जयशंकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य आहे. आमच्या अगदी दुर्गम गावांनाही डिजिटल करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यावरही आम्ही वेगाने काम करत आहोत. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर आमचा विकास अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की कोणीही मागे राहणार नाही.
आपल्या भाषणात ते म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानाने अलीकडच्या काळात अन्न सुरक्षा प्रणाली यशस्वीरित्या अपग्रेड केली आहे. भारतात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा अंतर्गत रेशन देण्यात आले आहे. 300 अब्जांहून अधिक किमतीचे फायदे डिजिटल पद्धतीने वितरित केले जात आहेत. भारताच्या विकासाबद्दल ते म्हणाले की, आम्ही दोन अब्जाहून अधिक लसी दिल्या आहेत.
भारत-यूएन भागीदारीचे प्रदर्शन करताना ते म्हणाले की, आपल्या पृथ्वीसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्रांसोबतची भागीदारी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या तत्त्वांवर आणि सनदेवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या दृष्टीने आजचे जग हे एक कुटुंब आहे.
युक्रेन संघर्ष हे आपल्या काळातील मोठे आव्हान आहे
जयशंकर म्हणाले की, युक्रेनमधील संघर्षामुळे अन्न आणि ऊर्जा महागाई वाढली आहे. यामुळे हे आपल्या काळातील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. ते म्हणाले की, भारताने अफगाणिस्तानातील लोकांनाही अन्नधान्य पुरवले आहे. ते म्हणाले की,जग हे एक कुटुंब आहे. उज्वल भविष्यासाठी भारत संयुक्त राष्ट्रांसोबतची भागीदारी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचा संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवर आणि बहुपक्षीयतेवर पूर्ण विश्वास आहे.
हे ही वाचा: