Free Sanitary Pads : प्रश्नकर्त्या विद्यार्थीनीला ‘ही’ कंपनी पुरवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन

Free Sanitary Pads : प्रश्नकर्त्या विद्यार्थीनीला ‘ही’ कंपनी पुरवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारच्या पाटनामध्ये एका विद्यार्थीनीने सर्वांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याची मागणी बिहारमधील सनदी अधीकारी तथा महिला विकास विभागाच्या प्रमुख हरजोत कौर बम्हरा यांना केली होती. या मागणीला हरजोत कौर बम्हरा यांनी अपमानीत करणारे उत्तर दिले होते. या प्रकरणानंतर दिल्लीतील एका फर्मने या विद्यार्थीनीला मोठे बक्षीस जाहीर केले आहे. दिल्लीतील हेल्थकेअर प्रायवेट लिमिटेड या सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपनीने संबंधित मुलीला एका वर्षासाठी सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही ही कंपनी उचलणार आहे. (Free Sanitary Pads)

एका वर्षासाठी सॅनिटरी नॅपकिन मोफत देणार कंपनी (Free Sanitary Pads)

हेल्थकेअर प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे सीईओ चिराग पान म्हणाले की, मासिक पाळीसारख्या विषयांवर बोलले जात नाही. हे बदलले पाहिजे. याबाबत बोलण्यासाठी आणखी काही मुली समोर आल्या पाहिजेत. आपण मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावाबद्दल खुले पणाने चर्चा व्हावी, अशी मागणी करत आहोत. सार्वजनिक व्यासपीठावर मासिक पाळी विषयी बोलणाऱ्या रियाच्या धैर्याला आम्ही सलाम करतो. पुढे बोलताना चिराग पान म्हणाले, आम्ही रियाला एक वर्षासाठी सॅनिटरी नॅपकिन मोफत देणार आहोत. तसेच तिच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार आहोत. (Free Sanitary Pads)

काय म्‍हणाल्‍या होत्‍या हरजोत कौर

विद्‍यार्थीनीच्‍या प्रश्‍नावर आयएएस अधिकारी हरजोत कौर म्‍हणाल्‍या की, आम्‍ही २० ते ३० रुपयांचा सॅनिटरी पॅडे देवू शकतो. उद्‍या जीन्स पँट सुद्धा देवू तसेच सुंदर बूटही देतो. शेवटी कुटुंब नियोजनाचा विषय आला की कंडोमसुद्‍धा आम्‍हाला मोफतच द्यावेच लागेल. तुम्‍हाला सर्व काही मोफत हवे याची सवय कशी काय लागली आहे, असा सवालही त्‍यांनी केला. तसेच सरकारकडून सर्व मोफत घेण्‍यापेक्षा स्‍वत:ला एवढं संपन्‍न करा की सरकारकडून काही घेण्‍याची गरजच भासू नये. सरकार तुम्‍हाला बरेच काही देत आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या होत्या.

सॅनिटरी नॅपकिनचा प्रश्न उपस्थित करणारी विद्यार्थीनी काय म्हणाली

२० वर्षीय रिया कुमारी यावेळी बोलताना म्हणाली की, अनेक गरिब मुली सॅनिटरी नॅपकिन विकत घेऊ शकत नाहीत. महिला विकास विभागाच्या प्रमुखांनी माझा प्रश्न चुकीच्या पद्धतीने घेतला. त्यांना वाटत असेल की, आम्ही आत्मनिर्भर व्हावे आणि सरकारवर निर्भर राहू नये.

तेजस्वी यादव यांच्याकडून 'कन्या उत्थान' कार्यक्रमाचा उल्लेख

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, कन्या उत्थान कार्यक्रमानुसार प्रत्येक मुलीला ३०० रूपये देण्यात येतात. रिया कुमारी या धैर्यवान मुलीने २० ते ३० रूपयांची मागणी केली होती. सरकार मुलींना प्रत्येक महिन्यात २५ रूपये देत आहे. या विद्यार्थीनीला आणि महिला विकास विभागाच्या प्रमुखांना याबाबत माहिती नसेल. (Free Sanitary Pads)

महिला विकास विभागाच्या प्रमुखांना विचारला होता प्रश्न

बिहारमध्ये बुधवारी 'सशक्त बेटी समृद्ध बिहार' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रिया कुमारी या २० वर्षीय विद्यार्थीनीने महिला विकास विभागाच्या प्रमुखांना प्रश्न केला की, सरकारकडून विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, सायकल तसेच इतर काही सुविधा दिल्या जातात, तर सरकार विद्यार्थीनींना २० ते ३० रूपयांचे सॅनिटरी नॅपकिन का देऊ शकत नाही? पण महिला विकास विभागाच्या प्रमुखांनी  मुलीने केलेल्या प्रश्नाला अपमानीत करणारे उत्तर दिले होते. (Free Sanitary Pads)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news