

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांचे बुधवारी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. ल्युकेमिया आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे.
जागतिक महासत्ता म्हणून देशाच्या उदयाचा मार्ग मोकळा करणारे नेते अशी जियांग झेमिन यांची ओळख होती. ते राष्ट्राध्यक्ष असताना चीनची वेगाने आर्थिक प्रगती केली. त्याच्या अध्यक्षतेखाली चीन एक मजबूत अर्थव्यवस्था असणारा देश झाला. तसेच साम्यवाद्यांनी सत्तेवरील आपली पकड घट्ट केली.
हेही वाचा :