

पुढारी ऑनलाइन डेस्क : दिल्ली एक्साईज पॉलिसी केस प्रकरणी ईडीने व्यावसायिक अमित अरोडाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी नीती मध्ये कथित घोटाळा केल्या प्रकरणी अंमल बजावणी संचलनालय (ईडी) ने बुधवारी कारवाई करत व्यवसायी अमित अरोडा याला अटक केली आहे. अमित अरोडा हा बडी रिटेल प्रायवेट लिमिटेडचा संचालक आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, अरोडा याला काल रात्री पीएमएलए कायद्यांतर्गत अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी ईडी त्यांच्या कोठडीची मागणी करू शकते.
ईडी ने दावा केला आहे की अमित अरोडा हा अन्य दोन आरोपी दिनेश अरोडा आणि अर्जून पांडे, दिल्ली चे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाचे जवळचे सहयोगी आहेत. दारु ठेकेदारांकडून मिळालेल्या पैशांना त्यांनीच लपवले होते. असे ईडीने म्हटले आहे.
कथित माहितीनुसार, भाजपने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसत असलेला व्यावसायिक अमित अरोडा हाच आहे. मागील आठवड्यात ईडी ने अमित च्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. आतापर्यंत ईडी ने या प्रकरणी मद्य विक्रेता समीर महेंद्रू, अरबिंदो फार्माचे चीफ शरद रेड्डी आणि विनय बाबू यांना अटक केली होती. तसेच इवेंट मॅनेजमेंट कंपनी ऑनली मच लाउडरचे पूर्व सीईओ विजय नायर यांनाही अटक केली होती.
हे ही वाचा :