Simon Taufel : सायमन टॉफेल यांनी सुरू केला ऑनलाइन अंपायरिंगचा कोर्स!

Simon Taufel : सायमन टॉफेल यांनी सुरू केला ऑनलाइन अंपायरिंगचा कोर्स!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमध्ये अंपायरिंगला वेगळं स्थान निर्माण करून देणाऱ्या सायमन टॉफेल यांनी पुन्हा एकदा अंपायरिंग सुधारण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. आयसीसी एलिट पॅनेलच्या या माजी पंचाने अंपायरिंगचे ऑनलाईन धडे देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी पंचांच्या प्रशिक्षण आणि विकासासाठी ऑनलाइन कोर्स सुरू केला आहे. या कोर्समध्ये पहिला परिचयाचा भाग शिकवला जाईल, त्यानंतर लेव्हल 1 आणि लेव्हल 2 या गोष्टींची माहिती दिली जाईल. टॉफेल यांनी दुबईच्या आयसीसी क्रिकेट अकादमीच्या सहकार्याने हा कोर्स तयार केला आहे आणि त्यात समाविष्ट असलेल्या सर्व गोष्टींना मान्यता मिळाली आहे. टॉफेल यांच्या या ऑलनाईन शिकवणीने अंपायरिंग स्तर उंचावेल अशी क्रिकेट वर्तृळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, टॉफेल यांनी हा कोर्स सुरू करण्याची कल्पना कशी सुचली याबाबत एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, अंपायरिंगमध्ये येणाऱ्या सर्व नवोदितांना मला चांगली संसाधने द्यायची आहेत. मला पंचांच्या गरजा आणि क्रिकेट सामन्यांमध्ये निर्णय घेण्याच्या वाढत्या अडचणी यातील अंतर कमी करायचे आहे. जर तुम्ही पंचांची क्षमता आणि आनंद वाढवू शकलात तर आमचा खेळ उत्तम होईल. आमच्या कोर्समध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात लोकांना व्हिडिओ आणि नोट्सद्वारे उत्तम दर्जाचे नॉलेज दिले जाणार आहे. ज्याचा प्रत्यक्ष मैदानात वापर करताना नक्कीच फायदा होईल. मला खात्री आहे की अगदी अनुभवी पंचही यातून काही कौशल्ये शिकतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॉफेल यांच्या कोर्सच्या तीन लेव्हल काय आहेत?

टॉफेल यांनी त्यांच्या कोर्सचे स्तर कशा पद्धतीने डिझाईन केले आहेत याबाबत स्पष्ट केले आहे. ते म्हणा की, अंपायरिंगच्या क्षेत्रात नुकतीच सुरुवात करणार्‍या प्रत्येकासाठी पहिला परिचय स्तर आहे आणि तो चार तासांत पूर्ण केला जाऊ शकतो. ज्यांनी क्लब स्तरावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी किमान एक पंच म्हणून वर्ष काम केले आहे अशांसाठी लेव्हल-1 चा प्रोग्राम असेल आणि याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आठ तास लागतील. तर लेव्हल 2 चा अभ्यासक्रम सध्या तयार केला जात आहे आणि यातील बहुतेक गोष्टी समोरासमोर शिकल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

सायमन टॉफेल यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेट पंचांमध्ये केली जाते. त्यांना पाच वेळा आयसीसी अंपायर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टॉफेल यांच्या नावावर 74 कसोटी, 174 एकदिवसीय आणि 34 T20I सामन्यांमध्ये अंपायरिंगचा अनुभव आहे. 1999 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग करणाऱ्या टॉफेल यांनी 2012 मध्ये या अंपयारिंगमधून निवृत्ती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news