

नवी दिल्ली / मुंबई; वृत्तसंस्था : चीनसह जगभरातील अनेक देशांत कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना व अमेरिकन बाजारावर मंदीचे सावट घोंगावत असतानाही भारतीय बाजारातील परकीय गुंतवणूक जोमात आहे. नोव्हेंबरपाठोपाठ डिसेंबरमध्येही म्हणजे सलग दुसर्या महिन्यात एफपीआयमधून विशुद्ध खरेदीपोटी केवळ आणि केवळ आवकच झालेली आहे. डिसेंबर महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात तब्बल 11 हजार 119 कोटींची गुंतवणूक केली आहे. (Foreign Investment In India)
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदार (एफपीआय) सध्या जरा सतर्कच आहेत. नोव्हेंबर महिन्यात एफपीआयच्या माध्यमातून 36 हजार 239 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत डिसेंबरमधील गुंतवणूक कमीच होती. असे असले तरी जगात सगळेच सापेक्ष असते म्हणून भारताच्या दृष्टीने हे तसे मोठेच यश म्हणावे लागेल. जगात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले असताना आणि अमेरिकेतील मंदीचे सावट अवघ्या जगावर असताना डिसेंबरमधील भारतातील ही गुंतवणूक काही थोडीथोडकी नाही, असे अर्थतज्ज्ञांतून मानले जाते. (Foreign Investment In India)
टॉप 10 पैकी 8 कंपन्यांना लाभ; दोन्हींना फटका
गेल्या आठवड्यात 10 सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे मूल्यांकन 1,35,794.06 कोटी रुपयांनी वाढले आहे. स्टेट बँक, रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ असून, केवळ हिंदुस्तान युनिलिव्हर आणि भारती एअरटेलमध्येच घसरण झाली.
या कंपन्या टॉप 10
अधिक वाचा :