Mataki Racipe : मोड आलेल्या मटकीची उसळ कशी तयार कराल?  | पुढारी

Mataki Racipe : मोड आलेल्या मटकीची उसळ कशी तयार कराल? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील अनेक रेसिपी खूप प्रसिद्ध आहेत. त्यात तिखट, झणझणीत आणि तोंडाला पाणी सोडणारे पदार्थ असेल की, खवय्येप्रेमी हमखास तिथे जातात. काही जण घरात तशी रेसिपी बनविण्याचा प्रयत्नही करतात. आज आपण अशी एक रेसिपी पाहणार आहोत. त्या रेसिपीचं नाव आहे मोड आलेल्या मटकीची (Mataki Racipe) उसळ… ती कशी तयार करायची, ते थोडक्यात जाणून घेऊ…

साहित्य 

१) मोड आलेली मटकी पाव किलो

२) कांदा एक, लसूण एक

३) पाव वाटी खोबरे, धने एक चमचा

४) तेल एक वाटी, आलं एक इंच

५) कोथिंबीर चिरून अर्धी वाटी

६) हळद, अर्धा चमचा मीठ

७) पाच-सहा लाल किंवा हिरव्या मिरच्या

८) खडा मसाला, गरम पाणी तीन भांडी

Mataki Racipe

कृती 

१) कांदा, खोबरे बारीक चिरून तव्यावर तेल टाकून भाजून घ्या.

२) धने, खडा मसाला आणि लाल मिरच्या थोडेसे तेल टाकून भाजून घ्याव्यात.

३) भाजलेला सर्व मसाला, सोललेला लसूण, आलं थोडेसे पाणी टाकून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे.

फोडणीसाठी तेल कडकडीत तापवावे. त्यात वाटलेला लसूण, मसाला, हळद टाकावी. झाकण ठेवावे.

४) मधून मधून हलवत राहावे. मसाल्याचा सुगंध सुटल्यावर मोड आलेली मटकी, टोमॅटो चिरून कोथिंबीर, मीठ घालावं. मटकी शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवावे. (Mataki Racipe)

या रेसिपी वाचल्या का?

Back to top button