भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार : ‘फिच रेटिंग्स’चा अंदाज, चीनच्‍या ‘जीडीपी’ला बसणार झटका

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार : ‘फिच रेटिंग्स’चा अंदाज, चीनच्‍या ‘जीडीपी’ला बसणार झटका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताचा आर्थिक विकास दर हा जगातील दहा सर्वाधिक प्रगती करणार्‍या अर्थव्‍यवस्‍थांमध्‍ये असणार आहे. भारताच्‍या मध्‍यावधी वाढीचा अंदाज ६.२ टक्‍के इतका असेल, असा अंदाज पतमानांकन संस्था "फिच रेटिंग्स'ने ( Fitch Ratings )  वर्तवला आहे. या संस्‍थेने यापूर्वी भारतीय अर्थव्‍यवस्‍था वाढीचा अंदाज ५.५ टक्‍के इतका वर्तवला होता. दरम्‍यान, चीनचा मध्‍यावधी वाढीचा अंदाज ५.३ ५.३ टक्क्यांवरून ४.६ टक्के इतका असेल, असेही या संस्‍थेने स्‍पष्‍ट केले आहे.

Fitch Ratings : 2023-24 साठी भारताचा विकास दर 6.3% असेल

"फिच रेटिंग्स'ने आपल्‍या अहवालात म्‍हटले आहे. "मागील काही महिन्यांत भारतातील रोजगार दरात सुधारणा झाली आहे. कार्यरत वयाच्या लोकसंख्येचा अंदाज देखील सुधारला आहे. भारताच्या श्रम उत्पादकतेचा अंदाजही इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. त्‍यामुळे आता भारताच्‍या मध्‍यावधी वाढीचा अंदाज ६.२ टक्‍के इतका असेल." आम्ही भारत आणि मेक्सिकोला मोठ्या प्रमाणावर अपग्रेड केले आहे. भारताचा विकास अंदाज 5.5% वरून 6.2% करण्यात आला आहे तर मेक्सिकोचा विकास अंदाज 1.4% वरून 2% पर्यंत वाढवला आहे. फिचने म्हटले आहे की 2023-24 साठी भारताचा विकास दर 6.3% असेल.

चीनच्‍या अर्थव्‍यवस्‍थेला बसणार झटका

'फिच रेटिंग्स' आपल्या अहवालात म्हटले आहे की, चीनमधून पुरवठा 0.7% कमी होईल. यामुळे चीनचा मध्यावधी वाढीचा अंदाज ५.३ टक्क्यांवरून ४.६ टक्के होईल. चीनच्या 'जीडीपी'तील घसरणीचा दहा उदयोन्मुख देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या देशांचा विकास दर ४.३ टक्क्यांवरून ४ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो.

ब्राझील आणि पोलंड वगळता सर्व टॉप-10 उदयोन्मुख बाजारपेठांसाठी नवीनतम अंदाज त्याच्या कोरोनापूर्व संभाव्य वाढीच्या अंदाजापेक्षा कमी आहेत. 10 उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये चीनचा वाटा 57 टक्के आहे. चीनला या देशांमधून वगळल्यास, उर्वरित 9 उदयोन्मुख बाजारपेठांसाठी सरासरी GDP वजन 3.2 टक्के असू शकते. यापूर्वी ते तीन टक्के असल्याचा अंदाज होता, असेही या अहवालात म्‍हटले आहे.

Fitch Ratings : भारतातील रोजगार दर आघाडीवर सुधारणा

'फिच'ने म्हटले आहे की, भारतातील रोजगाराच्या दरात सुधारणा आणि काम करणार्‍या वयोगटातील लोकसंख्येच्या अंदाजात माफक वाढ यामुळे उच्च वाढीचा अंदाज आहे. भारताच्या श्रम उत्पादकतेचा अंदाजही उच्च आहे. मात्र भारताची अंदाजित कामगार पुरवठा वाढ २०१९ च्या तुलनेत कमी आहे. महिलांमध्ये रोजगाराचे प्रमाण कमी असल्‍याचेही या अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news