Bengaluru Fire
Bengaluru Fire

Bengaluru Fire : बेंगळुरूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग! १० जणांचा मृत्यू

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेंगळुरू-होसूर महामार्गावर आज (दि. ७) संध्याकाळी फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Bengaluru Fire)

बेंगळुरू-होसूर महामार्गावर अट्टीबेले येथे आज अटीबेले फटाका कारखान्याला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीला पाहून आजूबाजूच्या परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. दिवाळी सणाच्या तोंडावर या दुकानामध्ये फटाके भरलेले होते. आजच्या भीषण दुर्घटनेने हा संपूर्ण परिसर हादरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दुकान मालकासह चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी 4.30 च्या सुमारास घडली असून अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक (बेंगळुरू ग्रामीण) मल्लिकार्जुन बलदंडी म्हणाले, "फटाक्यांच्या दुकानाला आग लागली, ज्यात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. पाच अग्निशमन गाड्या कार्यरत झाल्या आहेत. आग आता नियंत्रणात आहे."

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news