

पिंपरी : वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 8) दुपारी दीडच्या सुमारास देहूगाव-तळवडे रोडवर अभिरुची लॉज येथे ही कारवाई करण्यात आली.
राशिद हापीज बेग (23, रा. देहूगाव), लॉज मालक वसंत शेट्टी, राणी काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसंत शेट्टी आणि राणी काळे यांनी एका 22 वर्षीय महिलेला पैशांचे आमिष दाखवले. तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. यातून मिळणार्या पैशांवर आरोपीं आपली उपजीविका भागवत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा मारून 12 हजार 30 रुपयांचा ऐवज जप्त केला.