

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनियन सैन्याने शनिवारी दिलेल्या माहितीनूसार, त्यांनी कुपियान्स्क या रशियाच्या ताब्यात असणाऱ्या शहरात प्रवेश करून त्यांच्या सैन्याला बाजूला सारत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. रशियन सैन्याची हकालपट्टी करत त्यांनी हा भूभाग पुन्हा ताब्यात घेतला आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामध्ये रशिया हार मानत असल्याचे दिसून येत आहे. (Ukraine-Russia war)
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनच्या अनेक भागांवर रशियाने कब्जा केला होता. पण युक्रेन देखील हार मानणाऱ्यातला नव्हता. युक्रेनचं सैन्य हळू हळू हे सर्व प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेत असल्याचं दिसून येत आहे. कब्जा केलेल्या शहरांवर वर्चस्व ठेवंणं रशियाला सध्या जड जात असल्याचं चित्र आहे. जर्मनच्या परराष्ट्रमंत्री अॅनॅलेना बेअरबॉक (Annalena Baerbock) यांनी युक्रेन शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी रशियाविरूद्धच्या लढाईत युक्रेनला बर्लिनचा पाठिंबा आहे, असं जाहीर केलं. (Ukraine-Russia war)
इझियम हे रशियासाठी एक प्रमुख लष्करी केंद्र मानले जाते. याच ठिकाणी युद्धाच्या सुरूवातीच्या काळात मोठा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न रशियाने केला होता. आता याच भागातून रशियाना सैन्य मागे घेतलं आहे. त्यांनंतर तिसरं एक महत्त्वाचं शहर आहे बालाक्लिया येथून देखील सैन्यानं माघार घेतली आहे. येवढच नाहीतर युक्रेननं जर आणखी जोर धरला तर रशिया कीव देखील सोडायला तयार होईल अशी चर्चा आहे. एकूण या सर्व संघर्षामध्ये रशियानं केलेला सगळा खटाटोप हा निष्फळ ठरताना दिसून येत आहे.
युक्रेनच्या सैन्यानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कुपियान्स्क शहरामध्ये स्वयंचलित शस्त्र घेऊन सर्व तयारीने सैन्य उभे आहे. या फोटोंसोबत त्यांनी पोस्ट केलेल्या मजकूरात देखील असं लिहिले आहे की, युक्रेनियन आहेत आणि नेहमी युक्रेनियनच राहतील.
हेही वाचा