इमरान हाशमीसोबत दिसणारी निकिता दत्ता ‘ही’ आहे तरी कोण?

इमरान हाशमीसोबत दिसणारी निकिता दत्ता ‘ही’ आहे तरी कोण?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

इमरान हाशमीचा नवा हॉररपट रिलीज होण्यास सज्ज झालाय. आगामी हॉरर-थ्रिलर 'दिब्बुक – द कर्स इज रियल'चे अनावरण २९ ऑक्टोबरला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होतोय. या चित्रपटात इमरानसोबत निकिता दत्ता ही अभिनेत्री झळकणार आहे. निकिता दत्ता हिने यापूर्वी अभिषेक बच्चनसोबत द बिग बुलमध्ये दिसली होती.

कोण आहे निकिता दत्ता?

निकिताने अभिषेक बच्चनसोबत द बिग बुलमध्ये काम केलं होतं. निकिताचा जन्म १३ नोव्हेंबर, १९९१ रोजी झाला. ती फेमिना मिस इंडिया २०१२ ची फायनालिस्टपैकी एक होती.

तिने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात लेकर हम दीवाना दिल या चित्रपटातून केली होता. यामध्ये ती सहाय्यक भूमिका साकारली होती. तिने ड्रीम गर्ल मालिकेतही काम केलयं.

ती एक दूजे के वास्ते मालिकेतील सुमन तिवारी ही व्यक्तीरेखा साकारली होती. तर हासिलमध्ये आँचल श्रीवास्तवची भूमिका साकारली होती. कबीर सिंहमध्ये ही तिने जिया शर्माची वक्तीरेखा साकारली होती.

प्राईम व्हिडीओने या हॉरर-थ्रिलर चित्रपट 'दिब्बुक – द कर्स इज रियल'च्या रोमांचक टीजरचे अनावरण केले होते. या चित्रपटाची निर्मिती पैनोरमा स्टूडियोज आणि टी-सीरीज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या चित्रपटातून इमरान हाशमी आपले डिजिटल पदार्पण करत आह. हा चित्रपट २९ ऑक्टोबर, २०२१ ला अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

जय यांच्याद्वारे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट आहे. अमेझॉन ओरिजिनल चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झालेला मल्याळम ब्लॉकबस्टर चित्रपट – ईजराचा अधिकृत रिमेक आहे. ज्याला क्लिंटन सेरेजो यांनी संगीत दिले आहे.

हेलोवीनच्या स्पिरिटला जिवंत करत, टीजरने निश्चितपणे अंगावर काटा आणला आहे. इमरानसोबत, जो पुन्हा एकदा आपल्या पसंतीच्या हॉरर जॉनरमध्ये परतत आहे. या चित्रपटात निकिता आणि मानव कौलदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.

भीतीदायक टीजरमध्ये निकिता आपल्या व्यक्तिरेखेद्वारे दिब्बुक बॉक्स उघडते. ज्याच्या चारही बाजूला ट्रबल लिहिलेले आहे. त्यानंतर जे काही होते ती भयावह घटनांची मालिका आहे. हा टीझर पाहून दर्शकांचे अंगावर सरसरून काटा आणेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Dutta ? (@nikifying)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Dutta ? (@nikifying)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news