

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक मधील बहूचर्चित हिजाब प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी या प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी या प्रकरणात १६ सप्टेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे संकेत दिले आहेत.
कर्नाटक मधील शैक्षणिक संस्थांमधे हिजाब परिधान करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्याऱ्या याचिकेवर १४ सप्टेंबर पर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश देखील खंडपीठाने दिले आहेत.
खंडपीठाने यासंबंधी कर्नाटक सरकार ला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले उत्तर सादर करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे.यापूर्वी ८ सप्टेंबर ला या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली होती.
हेही वाचा