Feet and Fitness : पायांवरुनच तुम्‍हाला समजेल तुमची तंदुरुस्ती, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

Feet and Fitness :  पायांवरुनच तुम्‍हाला समजेल तुमची तंदुरुस्ती, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
Published on
Updated on

आपल्याला काही दुखलं, खुपलं किंवा बरं वाटत नसलं की ते सगळं आपल्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसतं, असं आपल्याला वाटतं. पण आता एका नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, आपल्या आरोग्याची सगळी खबरबात आपल्या पायांवरून समजते. तुम्ही तुमच्या पायाकडे काही मिनिटे काळजीपूर्वक पाहिलेत तर तुम्ही किती निरोगी किंवा तंदुरुस्त आहात हे लगेच कळून येते. तुम्हाला पायांवरून तुमचे आरोग्य तपासायचे असेल तर खालील गोष्टींकडे लक्ष द्या. ( Feet and Fitness )

कॅल्शियमची कमतरता : शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर नखे पांढरीफटक पडतात. तुम्ही योग्य आहार घेत नसला तरीही नखे पांढरी पडतात. पायाची नखे पांढरी पडली असली तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे. यासाठी आहारात दूध, ताक आणि इतर दुधाचे पदार्थ समाविष्ट करा. आवश्यकता असल्यास कॅल्शियमच्या गोळ्याही घ्या.

Feet and Fitness : पायांना भेगा असतील तर शरीरात पाण्याची कमतरता

हिमोग्लोबीनचा स्तर : तुमच्या पायांची नखे जर पिवळी होत असतील तर तुमच्या शरीरात हिमोग्लोबीन कमी आहे. हे थायरॉईडमुळे होते. तुम्ही चाळिशी पार केली असेल तर असे होण्याची शक्यता अधिक असते. शरीरात पाण्याची कमतरता : पायाला भेगा पडल्या असतील तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. काही महिलांच्या पायांना वर्षभर भेगा असतात. डॉक्टर मंडळींच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात जर भेगा पडत असतील तर चिंतेचे कारण नाही; पण जर वर्षभर पायांना भेगा असतील तर शरीरात पाण्याची कमतरता आहे हेच यावरून दिसते. यावर उपाय म्हणजे रोज अधिकाधिक पाणी प्या. याशिवाय फळांचे रस घ्या. पायांना सतत भेगा पडण्याने इन्फेक्शनही होऊ शकते. गर्भवती महिलांच्या पायांना भेगा पडत असतील तर त्यांच्या शरीरात कॅल्शियम, पोटॅशियम किंवा मॅग्नेशियमची कमतरता आहे. यावर उपाय आहे तो संतुलित आहाराचा.

डॅमेज नर्वस सिस्टम : कधी कधी आपले पाय सुन्न होतात किंवा कधी पायांत काहीतरी टोचल्यासारख्या वेदना होतात. याचा अर्थ आपल्या शरीरातील मज्जाव्यवस्था व्यवस्थित काम देत नाहीये. मधुमेह किंवा अधिक मद्यपान केल्याने असे होऊ शकते.

मधुमेहाचा संकेत : पायांवर सूज येत असेल आणि ती बरेच दिवस राहात असेल तर हे मधुमेहाचे लक्षण आहे. असे घडल्यास ताबडतोब मधुमेहाची चाचणी करून घेणे चांगले.

डॉ. मनोज शिंगाडे

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news