WhatsApp मध्‍ये मोठा बदल! आता 'स्टेटस'मध्ये लवकरच दिसणार जाहिराती

चॅट आणि कॉलिंग पूर्वीप्रमाणेच खासगी आणि जाहिरातमुक्त ठेवणार
Whatsapp New Feature
Whatsapp New Feature file Photo
Published on
Updated on

WhatsApp officially introduces ads : व्हॉट्सॲपने (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांसाठी एक मोठा बदल आणण्याचा निर्णय घेतला आहे.आतापर्यंत व्हॉट्सॲपचे सर्व फीचर्स पूर्णपणे मोफत होते; परंतु लवकरच अपडेट सेक्शनमध्ये जाहिराती आणि पेड चॅनेल सबस्क्रिप्शनची सुविधा सुरू होणार आहे. पुढील काही महिन्यांत जागतिक स्तरावर व्हॉट्सॲप स्टेटसवर जाहिराती लाँच करणार आहे. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरील जाहिरातीप्रमाणेच आता व्यवसायांना लवकरच जाहिरातींसाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

जाहिराती कुठे दिसतील?

व्हॉट्सॲपने स्पष्ट केले आहे की, वापरकर्त्यांना चॅट, ग्रुप किंवा कॉलमध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात दिसणार नाही. त्‍यामुळे तुम्ही फक्त व्हॉट्सॲपवर तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबाशी बोललात कोणताही फरक पडणार नाही;पण तुम्ही चॅनेल आणि स्टेटस वापरत असाल तर थोडा बदल दिसू शकतो. चॅनेल आणि स्टेटस अशा अपडेट टॅबमध्ये जाहिराती दाखवण्याचे नियोजन आहे. अॅलिस न्यूटन-रेक्स यांच्या नेतृत्वाखाली व्हॉट्सॲपने भारतातील वापरकर्त्यांसाठी विविध वैशिष्ट्ये सादर केली आहेत. त्यांनी भारतीय वापरकर्त्यांसाठी चॅट लॉक, शेड्यूल्ड मेसेजेस आणि व्हॉट्सॲप चॅनेल्स आदींचा समावेश आहे.

Whatsapp New Feature
WhatsApp युजर्स तयार राहा ! आता 'व्हॉट्सॲप' स्टेटस होणार स्मार्ट आणि अधिक खास

सशुल्क चॅनेल आणि सबस्क्रिप्शन

व्हॉट्सॲप आता कंटेंट क्रिएटर्स आणि ब्रँड्सना उत्‍पन्‍नवाढीच्‍या संधी देणार अहे.वापरकर्ते विशिष्ट चॅनेल्सना विशेष अपडेट्ससाठी सबस्क्राइब करू शकतील. यासाठी, दरमहा एक निश्चित रक्कम द्यावी लागेल. त्‍यामुळे तुम्‍हाला आता सर्वाधिक पसंतीच्‍या चॅनेल्सशी कनेक्ट राहण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत. तसेच काही चॅनेल्सना अधिकाधिक लोकांनी फॉलो करावेमधून त्‍यांना प्रमोटही केले जाणार आहे.

image-fallback
‘या’ स्मार्टफोन्सवर एक फेब्रुवारीपासून व्हॉट्सॲप पूर्णपणे बंद होणार!

सर्व बदल केवळ अपडेट टॅबपुरते मर्यादित

व्हॉट्सॲपने स्‍पष्‍ट केले आहे की, नवीन जाहिरातीसंदर्भातील बदल हे फक्त अपडेट टॅबपुरते मर्यादित असतील. वैयक्तिक चॅट आणि कॉलिंग सारखी वैशिष्ट्ये पूर्वीप्रमाणेच खाजगी आणि जाहिरातमुक्त राहतील.

Whatsapp New Feature
Twitter New Feature : ट्विटरवर लवकरच मिळणार व्हॉट्सॲप शेअर बटन; जाणून घ्या नवीन फिचर विषयी

आताच बदल का?

मेटा कंपनीने २०१४ मध्‍ये व्हॉट्सअॅप खरेदी केले.यानंतर या ॲपच्‍या माध्‍यमातून महसूल वाढण्‍यासाठी प्रयत्‍न झाले. आता भारतात कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅप चॅनेल आणि स्टेटस वापरतात. त्‍यामुळे अपडेट टॅबमध्ये जाहिराती दाखवण्याचे नियोजन आहे. व्हॉट्सअॅप चॅनेल आणि स्टेटसच्‍या माध्‍यमातून मेटा उत्‍पन्‍ना वाढ करण्‍याचे नियोजन करत आहे.

image-fallback
नकोय ती व्हॉट्सॲप ग्रुपची कटकट? : आता आपल्यासाठी ‘हा’ खास पर्याय!

काय परिणाम होईल?

मित्र परिवार व कुटुंबीयांबरोबरील चॅट व संवादासाठी तुम्‍ही व्‍हॉटसॲप वापरत असाल तर यामध्‍ये कोणताही बदल होणार नाही;परंतू तुम्‍ही बातम्या, मनोरंजन किंवा सार्वजनिक अपडेटसाठी व्हॉट्सअॅप वापरतात त्यांच्यासाठी अॅपचा अनुभव थोडा बदलणार आहे. आता स्‍टेटस आणि चॅनेलमध्‍ये जाहिराती आल्‍यामुळे विनाजाहीरात अपडेट टॅब वापराची सवय लागणार्‍यांसाठी हा नवीन अनुभव असणार आहे.

Whatsapp New Feature
व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन आता अधिक ‘शक्तीमान’ होणार ; कोणाचेही मेसेज थेट डिलीट करणार !

'व्यवसायांची व्हॉट्सॲपवर जाहिरातींसाठी बर्‍याच काळापासून विनंती'

व्हॉट्स पच्या व्ही-पी उत्पादन ॲलिस न्यूटन-रेक्स यांनी सांगितले की, वैयक्तिक संदेश, कॉल आणि स्टेटस एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहतील. व्यवसायांची व्हॉट्सअॅपवर जाहिरातींसाठी बर्‍याच काळापासून विनंती केली आहे. आता, मोठे आणि लहान दोन्ही व्यवसाय जाहिराती व्यवस्थापकाकडे येऊ शकतात आणि या जाहिराती काढू शकतात आणि जाहिरातींसाठी पैसे देण्यासाठी त्यांचे आर्थिक नियोजन करुन शकतात. हे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जाहिराती घेणाऱ्या कोणत्याही आकाराच्या व्यवसायांसारखेच वाटेल. अपडेट्स टॅबमध्ये जाहिराती दाखवण्यासाठी, व्हॉट्सअॅप देश किंवा शहर, भाषा, तुम्ही फॉलो करत असलेले चॅनेल आणि वापरकर्त्याचा त्यांना दिसणाऱ्या जाहिरातींशी असलेला संवाद यासारख्या स्थान डेटाचा वापर करेल. अकाउंट्स सेंटरमध्ये व्हॉट्सअॅप जोडण्याचे निवडलेल्या लोकांसाठी, प्लॅटफॉर्म मेटा खात्यांमधील जाहिरात प्राधान्ये आणि माहिती वापरेल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. सुरुवातीला निवडक चॅनेल भागीदारांसाठी हे उपलब्ध असेल. आम्हाला ते अधिक व्यापकपणे आणण्याची आशा आहे. सुरुवातीला आम्ही निश्चित शुल्क घेणार नाही, म्हणून ते थेट चॅनेल प्रशासकांना दिले जाईल. वापरकर्त्यांकडून अॅप स्टोअरद्वारे पेमेंट केले जातील," असेही न्यूटन-रेक्स यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Whatsapp New Feature
WhatsApp : व्हॉट्सॲप ऑक्टोबरमध्येच बंद का पडते? मेटाने केला ‘मोठा’ खुलासा

गोपनीयतेचा धोका : जाणून घ्‍या तज्ज्ञ काय म्‍हणतात

कायदेशीर आणि आयटी गोपनीयता तज्ज्ञांनी म्‍हटलं आहे की, सध्‍या तरी अपडेट्स टॅबमध्ये जाहिराती दाखविल्‍या तरी तात्‍काळ गोपनीयतेचा धोका दिसला आहे. व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन बदलले जात नाही तोपर्यंत जाहिराती वैशिष्ट्य चिंताजनक राहणार नाही. मात्र स्थान डेटा हा वैयक्तिक डेटा मानला जाऊ शकतो;परंतु भारताचा डेटा संरक्षण कायदा अद्याप लागू झालेला नाही. त्‍यामुळे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांची संमती घेण्यास बांधील नाहीत. पुढे हाचे डेटा वापरला जावू शकतो. व्हॉट्सअॅपसारख्या सेवेसाठी उत्पन्नाचा प्रवाह असणे चांगले आहे. मात्र याचावापर द्वेषपूर्ण भाषणासह अन्‍य बेकायदेशी कृत्‍यांना होण्‍याचाही धोका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news