नवे वर्ष लाखो व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी महागडे असणार आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून व्हॉट्सॲप अनेक स्मार्टफोनवर काम करणे थांबवेल. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप चॅटिंगसाठी नवीन फोन खरेदी करणे आवश्यक असेल. कंपनी गेल्या काही महिन्यांपासून वापरकर्त्यांना याबद्दल सतर्क करत आहे.व्हॉट्सॲप आयओएस 7 व त्याहून अधिक जुन्या आयफोनवर सपोर्ट करू शकणार नाही. त्याचबरोबर व्हॉट्सॲप अँड्रॉईड 2.3.7 आणि त्यापूर्वीच्या व्हर्जनवर सपोर्ट करणे थांबवेल.
अधिक वाचा : एका चुटकीत 'या' अॅपमधून करा 'पीएफ'ची कामे!
गुगलने जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार जगभरात जवळपास 7.5 दशलक्ष स्मार्टफोन जुन्या अँड्रॉइड व्हर्जनवर काम करतात. या वापरकर्त्यांना आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी 1 फेब्रुवारीपूर्वी त्यांचे स्मार्टफोन अपग्रेड करावे लागतील.
'पुढील सात वर्षे पाहता आम्हाला ज्या ऑपरेटिंग सिस्टम्सचे वापरकर्ते सर्वाधिक आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. ज्या डिव्हाइसेसवर व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार आहे, त्यांनी व्हॉट्सअॅपच्या प्रवासात खूप योगदान दिले आहे. तथापि, आता हे स्मार्टफोन कालबाह्य झाले आहेत आणि आता ते भविष्यात येणाऱ्या नवीन वैशिष्ट्यांना योग्यरित्या पाठिंबा देऊ शकत नाहीत. हा निर्णय आमच्यासाठी खूप कठीण होता पण वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपचा चांगला अनुभव देणे खूप महत्वाचे होते.
अधिक वाचा : अखेर व्हॉट्सॲपला दया आली; खास ग्रुप ॲडमिनसाठी आणले भन्नाट फिचर!
31 डिसेंबर 2019 पासून व्हॉट्सॲपने सर्व विंडोज स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप थांबवले आहे. कंपनीने अधिकृत निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली होती. 31 डिसेंबर 2019 पासून वापरकर्ते विंडोज फोन ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सॲप वापरण्यास सक्षम नसतील आणि 1 जुलै 2020 पासून व्हॉट्सॲप मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरही उपलब्ध होणार नाही.
अधिक वाचा : नेटफ्लिक्स'ला आव्हान; तब्बल एक कोटी खेचले!