WhatsApp युजर्स तयार राहा ! आता 'व्हॉट्सॲप' स्टेटस होणार स्मार्ट आणि अधिक खास

Whatsapp new feature | जाणून घ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसमध्ये काय होणार नवीन बदल
Whatsapp new feature
Whatsapp new featureFile Photo
Published on
Updated on

Whatsapp new feature Update

नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगभरात व्हॉट्सॲपचे (WhatsApp) कोट्यवधी युजर्स आहेत. व्हॉट्सॲप युजर्सचा अनुभव आणखी खास करण्यासाठी कंपनी सातत्याने नवीन अपडेट्स देत असते. अलीकडेच मेटाने (Meta) व्हॉट्सॲपच्या स्टेटस आणि कॅमेरा सेक्शनमध्ये काही महत्त्वाचे बदल केले होते.

आता पुन्हा एकदा मेटा कंपनी व्हॉट्सॲप (Whatsapp) स्टेटस सेक्शनमध्ये एक मोठा अपडेट घेऊन येत आहे. या नव्या अपडेटनंतर युजर्सना इतरांचे स्टेटस आपल्या स्वतःच्या स्टेटसवर शेअर करता येणार आहेत. पण, यात एक खास ट्विस्ट आहे, ती म्हणजे जो व्हॉट्सॲपला यामध्ये इंन्स्टाग्रामपेक्षा (Instagram) एक पाऊल पुढे नेत आहे. चला जाणून घेऊया...व्हॉट्सॲपचे नवीन फीचर नेमकं काय आहे आणि ते कसं काम करेल?

व्हॉट्सॲप युजर्स आता स्टेटस रीशेअर करू शकणार ; कंपनी

WABetaInfo च्या ताज्या रिपोर्टनुसार, कंपनी एक असं अपडेट घेऊन येत आहे, ज्यामुळे कोणताही स्टेटस रीशेअर करणं अधिक सोपं होणार आहे. आतापर्यंत व्हॉट्सॲपवर तुम्ही फक्त तेवढेच स्टेटस रीशेअर करू शकत होता, ज्यामध्ये तुम्हाला मेंशन करण्यात आलं असेल. पण या नव्या अपडेटनंतर, कोणताही व्हॉट्सॲप युजर तुमचा स्टेटस रीशेअर करू शकेल. यामध्ये प्रायव्हसीचा विचार करून कंपनीने एक पर्याय देखील दिला आहे. या पर्यायाद्वारे, तुम्ही इतरांना स्टेटस रीशेअर करण्याची परवानगी द्यायची की नाही, हे नियंत्रित करू शकता. विशेष म्हणजे, अशी सुविधा सध्या इंन्स्टाग्रामवर उपलब्ध नाही.

असं वापरता येणार व्हॉट्सॲपचे (WhatsApp) नवीन फिचर

WABetaInfo ने स्क्रीनशॉटमध्ये व्हॉट्सॲपच्या नवीन फिचरची एक झलक दाखवली आहे. जेव्हा व्हॉट्सॲप स्टेटस एखादा स्टेटस अपडेट रीशेअर करण्यासाठी पात्र (eligible) असेल, तेव्हा स्टेटस व्यूअर (Viewer) इंटरफेसमध्ये एक विशेष बटन दिसून येईल. या बटनवर टॅप केल्यावर युजर्स त्या स्टेटस अपडेटला त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत थेट फॉरवर्ड करू शकतील. त्यामुळे यापुढे स्क्रीनशॉट घेण्याची किंवा मजकूर/माध्यमं कॉपी करण्याची गरज भासणार नाही.

image-fallback
तर व्हॉट्सॲप कॉल, व्हिडिओ कॉल होणार बंद! 

मेसेज सारांश फिचर देखील लवकरच !

याव्यतिरिक्त, सध्या मेटा कंपनी आणखी एका नव्या फीचरवर काम करत आहे, जे तुमच्या मेसेजचा सारांश देखील (summary) दाखवेल. म्हणजेच, जर तुम्हाला खूप जास्त मेसेज येत असतील आणि सर्व मेसेज वाचणं शक्य नसेल, तर अशा परिस्थितीत हे फीचर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. हे फीचर बरंचसं Apple च्या समरी नोटिफिकेशन (Summary Notification) फीचरप्रमाणे वाटत आहे, जिथे थोडक्यात संपूर्ण माहिती मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news