WhatsAppवर नंबर नाही, आता दिसेल 'यूजरनेम'...येतंय खास प्रायव्हसी फीचर, काय असेल खास

Whatsapp New Feature latest news: पुढील महिन्यात सर्व युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता
Whatsapp New Feature
Whatsapp New Feature file Photo
Published on
Updated on

WhatsApp username feature latest update

प्रायव्हसीची (गोपनीयतेची) काळजी घेणाऱ्यांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. लवकरच WhatsApp एक असं फीचर आणत आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणाशीही चॅट करताना तुमचा फोन नंबर दाखवण्याची गरज पडणार नाही. सध्या WhatsApp वर तुम्ही कोणालाही मेसेज केल्यास, त्या व्यक्तीला तुमचा फोन नंबर दिसतो. मात्र, येणाऱ्या नवीन फीचरमुळे तुमचा नंबरऐवजी फक्त तुमचं युनिक यूजरनेम (Unique Username) दिसेल.

Whatsapp New Feature
WhatsApp status privacy | तुमचे व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस् आता कोणीही शेअर करू शकणार नाही!

काय आहे 'यूजरनेम' (Username) फीचर?

या नवीन फीचरला 'यूजरनेम' (Username) असं नाव देण्यात आलं आहे. जे वापरकर्ते मेसेज पाठवताना आपला नंबर शेअर करू इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी हे फीचर खूप फायदेशीर ठरणार आहे. या फीचरमुळे तुम्ही तुमचा आवडता यूजरनेम तयार करू शकाल. हा यूजरनेम तुमच्या प्रोफाइलवर दिसू शकेल आणि लोक तुमच्याशी तुमच्या नंबरऐवजी या यूजरनेमद्वारेच जोडले जातील. गोपनीयता (Privacy) वाढवण्यासाठी हे फीचर खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

Whatsapp New Feature
WhatsApp Hidden Features: व्हॉट्सॲपचे 13 भन्नाट लपलेले फिचर्स, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल; जाणून घ्या सविस्तर

टेस्टिंग फेजमध्ये आहे फीचर

WABetaInfo ने WhatsApp च्या बीटा वर्जन 2.25.28.12 मध्ये या नवीन फीचरबद्दल माहिती दिली आहे. म्हणजेच, हे फीचर सध्या चाचणी (Testing) अवस्थेत आहे. लवकरच ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Whatsapp New Feature
WhatsApp Video Calling Without Internet | आता इंटरनेटशिवायही होणार व्हॉटस्अ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग!

आत्ताच 'रिझर्व्ह' करा तुमचा यूजरनेम

हे फीचर अजून सर्व युजर्ससाठी आले नसले तरी, ॲपच्या कोडमध्ये प्रोफाइल सेक्शनमध्ये एक नवीन पर्याय दिसला आहे. या पर्यायाद्वारे वापरकर्ते त्यांचे पसंतीचे यूजरनेम निवडू शकतील आणि ते 'रिझर्व्ह' (Reserve) करू शकतील. याचा अर्थ, फीचर लाईव्ह होताच तुम्हाला तुमचा आवडता यूजरनेम लगेच मिळेल.

Whatsapp New Feature
Whatsapp देणार Google Meet, Zoomला टक्कर, व्हॉट्सॲपमध्ये 'शेड्यूल कॉल्स' फीचरची धमाकेदार एंट्री

यूजरनेम (Username) कसा निवडायचा?

WhatsApp यूजरनेम निवडण्यासाठी काही नियम लागू करत आहे:

  • यूजरनेमची (Username) सुरुवात 'www' ने होऊ शकत नाही.

  • त्यामध्ये किमान एक अक्षर असणे आवश्यक आहे.

  • तुम्ही अंक, अंडरस्कोर (_) आणि डॉट (.) यांसारखे काही विशिष्ट कॅरेक्टर्स वापरू शकता.

  • या नियमांमागे कोणतीही फर्जी प्रोफाइल (Fake Profile) तयार होऊ नये किंवा कोणी वेबसाइट किंवा ब्रँडसारखे नाव निवडू नये, हा उद्देश आहे.

Whatsapp New Feature
WhatsApp: बँक खातं सुरक्षित ठेवायचंय? व्हॉट्सॲप स्क्रीन मिररिंग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Telegram मध्ये आहे, पण Zoho च्या Arattai मध्ये नाही

असं यूजरनेम-आधारित चॅटिंग फीचर टेलिग्राममध्ये (Telegram) आधीपासूनच उपलब्ध आहे. त्यामुळे यूजर्सना नंबर शेअर न करता बोलता येतं. पण विशेष म्हणजे, WhatsApp मध्ये येत असलेले हे फीचर Zoho च्या Arattai सारख्या ॲप्समध्ये देखील उपलब्ध नाही. त्यामुळे हे फीचर WhatsApp च्या प्रायव्हसी पर्यायांमध्ये एक मोठे पाऊल ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news