

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉटस्अॅप (Whatsapp) आपल्या युजर्ससाठी एक नवीन आणि अत्यंत उपयुक्त फीचर घेऊन येत आहे. या फीचरमुळे युजर्स त्यांचे स्टेटस अपडेटस् कोणी शेअर करू शकेल किंवा नाही, यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकणार आहेत. सध्या हे फीचर अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये (v2.25.27.5) उपलब्ध झाले असून, लवकरच ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
व्हॉटस्अॅपच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना त्यांचे स्टेटस शेअरिंगचे अधिकार मर्यादित करता येणार आहेत. ‘अलाऊ शेअरिंग’ (Allow Sharing) नावाच्या एका नवीन टॉगल बटणामुळे युजर्स ठरवू शकतील की त्यांचे स्टेटस कोणीही शेअर करू नये. विशेष म्हणजे, हे फीचर डिफॉल्टनुसार बंद (Disabled) असणार आहे, ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी आपोआप जपली जाईल. ज्यांना आपले स्टेटस इतरांना शेअर करण्याची परवानगी द्यायची आहे, त्यांना ते स्वतः चालू करावे लागेल.
हे फीचर युजर्सना त्यांच्या स्टेटस शेअरिंगवर अभूतपूर्व नियंत्रण देईल.
परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार : युजर्स ठरवू शकतील की त्यांचे स्टेटस इतरांना पुन्हा शेअर (Re-share)) करण्याची परवानगी द्यायची की नाही.
ओळख गोपनीय राहील : जरी तुम्ही शेअरिंगला परवानगी दिली आणि कोणी तुमचे स्टेटस शेअर केले, तरी त्यावर ‘मूळ पोस्ट’ कोणाची आहे हे दाखवणारे लेबल दिसेल, परंतु तुमचे नाव किंवा नंबर गोपनीय राहील.
नोटिफिकेशन मिळणार : जर तुमचे स्टेटस् कोणी शेअर केले, तर तुम्हाला त्याची सूचना मिळेल. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि आपल्या कंटेंटवर आपले नियंत्रण राहील.