WhatsApp Paid Subscription: व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार? सबस्क्रिप्शन न घेतल्यास काय होणार?

WhatsApp Paid Subscription: व्हॉट्सॲप लवकरच सबस्क्रिप्शन मॉडेल आणू शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. पैसे दिल्यास स्टेटस आणि चॅनेल्समधील जाहिराती बंद होतील, तर सबस्क्रिप्शन न घेतल्यास जाहिराती पाहाव्या लागू शकतात.
WhatsApp Paid Subscription
WhatsApp Paid SubscriptionPudhari
Published on
Updated on

WhatsApp Paid Subscription: आज जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉट्सॲपसाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे. कारण, कंपनी सबस्क्रिप्शन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच, व्हॉट्सॲप वापरताना जाहिराती पाहायच्या नसतील, तर युजर्सला पैसे मोजावे लागू शकतात.

गेल्या वर्षी मेटा कंपनीने व्हॉट्सॲपच्या स्टेटस आणि चॅनेल्समध्ये जाहिराती सुरु करण्यासाठी काही टेस्ट केल्या होत्या. या निर्णयावर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र टीकेनंतरही कंपनीने माघार घेतली नाही. उलट, आता जाहिराती दिसू नये म्हणून सबस्क्रिप्शनचा प्लॅन कंपनी आणत आहे.

Ad-Free सबस्क्रिप्शनची तयारी?

अलीकडेच व्हॉट्सॲपच्या व्हर्जन 2.26.3.9 च्या कोडमध्ये काही नवीन स्ट्रिंग्स आल्या आहेत. या स्ट्रिंग्समधून असं दिसतय की, स्टेटस आणि चॅनेल्समध्ये दिसणाऱ्या जाहिराती बंद करण्यासाठी Ad-Free सबस्क्रिप्शन आणलं जाऊ शकतं. सध्या कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरीही रिपोर्ट्सवरून व्हॉट्सॲप या दिशेने काम करत असल्याचं स्पष्ट होत आहे.

WhatsApp Paid Subscription
Sanjay Raut |अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला चालणार नाही : मुंबई महापौरपदाबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

पैसे दिले नाहीत तर काय होणार?

जर युजरने सबस्क्रिप्शन घेतलं नाही, तर त्यांना व्हॉट्सॲपच्या स्टेटस आणि चॅनेल्समध्ये वारंवार जाहिराती पाहाव्या लागू शकतात. मात्र जे युजर्स पैसे देऊन सबस्क्रिप्शन घेतील, त्यांना जाहिरातमुक्त (Ad-Free) व्हॉट्सॲप वापरता येईल.

महत्त्वाचं म्हणजे, सध्या हे सबस्क्रिप्शन फक्त स्टेटस आणि चॅनेल्समध्ये दिसणाऱ्या जाहिरातींसाठीच असण्याची शक्यता आहे. म्हणजेच, चॅट्स किंवा कॉलिंगसारख्या इतर फीचर्समध्ये जाहिराती येण्याची शक्यता कमी आहे.

WhatsApp Paid Subscription
UGC New Rules 2026: यूजीसीच्या नव्या नियमांवरून गोंधळ; काय आहेत नियम, विरोध का होतोय, सुप्रीम कोर्टाची भूमिका काय?

आतापर्यंत
– सबस्क्रिप्शनची किंमत किती असेल,
– जाहिराती बंद करण्याव्यतिरिक्त आणखी कोणते फीचर्स मिळतील,
– आणि हे सबस्क्रिप्शन कधीपासून लागू होईल,
याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

एवढं मात्र नक्की की, व्हॉट्सॲप आता हळूहळू जाहिरात आणि सबस्क्रिप्शन आधारित मॉडेलकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे भविष्यात मोफत व्हॉट्सॲपचे मॉडेल बदलू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news