Vivo V60ची भारतात धमाकेदार एंट्री! दमदार बॅटरी, AI फीचर्ससह पाणी आणि धुळीला देणार चॅलेंज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo V60 India launch latest update: स्मार्टफोन १९ ऑगस्टपासून Vivo इंडियाच्या ई-स्टोअर, प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
Vivo V60 India launch
Vivo V60 India launchPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने (Vivo) मंगळवारी (दि.१२) भारतात आपल्या लोकप्रिय V-सिरीजचा नवीन स्मार्टफोन, Vivo V60, लॉन्च केला आहे. हा एक मिड-रेंज स्मार्टफोन असला तरी, यात 6500mAh क्षमतेची मोठी बॅटरी, स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा यांसारखी दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, हा फोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 आणि IP69 रेटिंगसह येतो. Vivo V50 च्या या अपग्रेडेड मॉडेलमध्ये काय खास आहे, चला जाणून घेऊया.

किंंमत श्रेणीतील इतर स्मार्टफोन्सना देणार जोरदार टक्कर

Vivo V60 हा मिड-रेंज सेगमेंटमध्ये प्रीमियम फीचर्स देणारा एक आकर्षक पर्याय म्हणून समोर आला आहे. विशेषतः मोठी बॅटरी, उत्कृष्ट कॅमेरा सेटअप आणि मजबूत बिल्ड क्वालिटी यामुळे हा फोन आपल्या किंमतीच्या श्रेणीतील इतर स्मार्टफोन्सना जोरदार टक्कर देण्याची शक्यता असल्याचे मत टेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Vivo V60 India launch
15 हजारांत स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय? 'हे' आहेत बेस्ट पर्याय

Vivo V60: किंमत आणि उपलब्धता

Vivo कंपनीने हा फोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार मॉडेल निवडता येईल.

  • 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज: 36,999 रुपये

  • 8 GB रॅम + 256 GB स्टोरेज: 38,999 रुपये

  • 12 GB रॅम + 256 GB स्टोरेज: 40,999 रुपये

  • 16 GB रॅम + 512 GB स्टोरेज: 45,999 रुपये

Vivo V60 स्मार्टफोन या रंगसंगतीत उपलब्ध

हा स्मार्टफोन ऑस्पिशियस गोल्ड (Auspicious Gold), मिस्ट ग्रे (Mist Grey), आणि मूनलिट ब्लू (Moonlit Blue) या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची विक्री १९ ऑगस्टपासून विवो इंडियाच्या ई-स्टोअर, प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.

Vivo V60 India launch
तुम्ही विचार देखील करू शकत नाही 'इतक्या' कमी किंमतीत मिळणार 5G स्मार्टफोन !

Vivo V60: प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले आणि प्रोसेसर: Vivo V60 मध्ये 6.77-इंचाचा 1.5K (1,080×2,392 पिक्सल) क्वाड-कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो. यामुळे वापरकर्त्यांना एक उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळतो. फोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर असून, यात 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय मिळतो.

  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी, Vivoने या फोनमध्ये Zeiss ब्रँडिंगसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे.

  • प्रायमरी कॅमेरा: 50-मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर

  • टेलिफोटो लेन्स: 50-मेगापिक्सलचा Sony IMX882 सेन्सर

  • अल्ट्रा-वाइड लेन्स: 8-मेगापिक्सलचा लेन्स

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

  • बॅटरी आणि चार्जिंग: या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची 6500mAh क्षमतेची मोठी बॅटरी, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे फोन लवकर चार्ज होतो आणि दिवसभर सहज चालतो.

  • सॉफ्टवेअर आणि इतर फीचर्स: हा फोन Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर चालतो. कंपनीने या डिव्हाइससाठी 4 वर्षांचे मोठे OS अपग्रेड आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. यात AI Image Expander, AI Smart Call Assistant, आणि AI-backed Block Spam Call सारखे अनेक AI फीचर्स आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news