तुम्ही विचार देखील करू शकत नाही 'इतक्या' कमी किंमतीत मिळणार 5G स्मार्टफोन !

AI+ mobile 5G smartphone | AI+ ब्रँडची भारतात धमाकेदार एन्ट्री, 8 जुलैला होणार लाँच
AI+ mobile 5G smartphone
AI+ mobile 5G smartphonePudhari Photo
Published on
Updated on

AI mobile coming soon 2025

टेक न्यूज : भारतीय स्मार्टफोन बाजारात लवकरच एक नवीन ब्रँड धुमाकूळ घालणार आहे. माधव सेठ यांच्या नेतृत्वाखालील AI+ हा ब्रँड ८ जुलै रोजी आपले दोन नवीन स्मार्टफोन Nova 5G आणि Pulse 4G लाँच करणार आहे. विशेष म्हणजे, या फोनची सुरुवातीची किंमत फक्त 5 हजार रुपये असणार आहे, ज्यामुळे बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. हे फोन केवळ फ्लिपकार्टवर (Flipkart) विक्रीसाठी उपलब्ध असतील.

काय आहेत 'या' स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये?

AI+ ब्रँडचा दावा आहे की, ते कमी किमतीत सर्वोत्तम फीचर्स आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित स्मार्ट सुविधा देणार आहेत.

Nova 5G:

किंमत : याची सुरुवातीची किंमत 5 हजार रुपये असेल.

कॅमेरा : यात 50 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाईल.

बॅटरी : 5000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी असेल.

स्टोरेज : फोनमधील स्टोरेज 1 टीबी (TB) पर्यंत वाढवता येईल.

प्रोसेसर : यात 6 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित Unisoc T8200 चिपसेट असेल.

Pulse 4G:

हा Nova 5G पेक्षा स्वस्त पर्याय असेल. यात 12 नॅनोमीटरचा Unisoc T7250 चिपसेट मिळेल. मात्र, बॅटरी आणि कॅमेरा फीचर्स Nova 5G सारखेच असतील.

भारतातच बनवलेले, खास AI फीचर्स

हे दोन्ही फोन NxtQuantum OS वर चालतील, जे अँड्रॉइड 15 वर आधारित आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम खास भारतासाठी बनवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, या फोनमध्ये अनावश्यक ॲप्स (Bloatware) नसतील आणि अनेक खास AI फीचर्स मिळतील. या फोनचे डिझाइन आणि उत्पादन भारतातच केले जाणार आहे. तसेच, फोन बनवण्यासाठी काही प्रमाणात रिसायकल केलेल्या साहित्याचा वापरही केला जाईल. 8 जुलै रोजी लाँच झाल्यानंतरच या फोनची खरी कामगिरी कशी आहे हे स्पष्ट होईल. या फोनबद्दल अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टवर याचे पेज लाईव्ह करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news