UPI users alert: UPI यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी! १ ऑक्टोबरपासून PhonePe, Google Pay वर ‘हे’ व्यवहार होणार बंद

UPI rules change from October latest update: वाढत्या सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे
Important news for UPI users
Important news for UPI usersPudhari Photo
Published on
Updated on

भारतातील डिजिटल पेमेंट्समध्ये मोठा बदल होत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जाहीर केले आहे की, १ ऑक्टोबर २०२५ पासून यूपीआयमधील 'मनी रिक्वेस्ट' (Money Request) किंवा 'कलेक्ट रिक्वेस्ट' (Collect request) फिचर पूर्णपणे बंद होणार आहे. हा निर्णय वाढत्या सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी घेतला आहे.

काय बदलणार?

  • पिअर-टू-पिअर (P2P) कलेक्ट रिक्वेस्ट: आता कोणीही दुसऱ्या व्यक्तीकडून यूपीआयवर पैसे मागू शकणार नाही. म्हणजे, बिल शेअर करणे, मित्राकडून पैसे मागणे यासाठी 'रिक्वेस्ट' पाठवता येणार नाही.

  • फसवणुकीला आळा: गेल्या काही वर्षांत फसवणूक करणाऱ्यांनी बनावट रिक्वेस्ट पाठवून अनेकांना गंडा घातला. अनेक युजर्स चुकीने पैसे ट्रान्सफर करत होते. हे थांबवण्यासाठी NPCI ने हे पाऊल उचलले आहे.

  • सुरक्षितता वाढणार: आता प्रत्येक व्यवहार 'पेयर्स'नेच (पैसे पाठवणाऱ्याने) सुरू करावा लागेल. त्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल.

Important news for UPI users
UPI मोफत, मग Google Pay आणि PhonePe ने कसे कमावले 5,065 कोटी रुपये? हे आहे खरं कारण

काय सुरू राहील?

  1. यूपीआय आयडी, QR कोड, मोबाईल नंबर वापरून पैसे पाठवता येतील.

  2. व्यापाऱ्यांकडून (मर्चंट) येणाऱ्या रिक्वेस्टला उत्तर देता येईल. म्हणजेच, डिलिव्हरी अ‍ॅप्स, ऑनलाईन शॉपिंगसाठी रिक्वेस्ट सुरू राहतील.

  3. पैसे मागण्यासाठी आता स्वतःच यूपीआय आयडी शेअर करावा लागेल किंवा QR कोड पाठवावा लागेल.

Important news for UPI users
UPI GST 2025 | 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर GST लागणार? केंद्राचा मोठा खुलासा...

युजर्संवर काय परिणाम होणार?

  • सोप्या 'रिक्वेस्ट' फिचरचा वापर बंद: मित्राकडून पैसे मागताना आता थेट रिक्वेस्ट पाठवता येणार नाही. त्याऐवजी, स्वतःचा यूपीआय आयडी, QR कोड शेअर करावा लागेल किंवा वेगळा मेसेज पाठवावा लागेल.

  • सुरक्षितता वाढणार: फसवणुकीचे प्रमाण कमी होईल. NPCI च्या मते, हे पाऊल ग्राहकांचे संरक्षण आणि यूपीआयवरील विश्वास वाढवण्यासाठी आहे.

  • बहुतेक व्यवहारांवर परिणाम नाही: यूपीआयवर पैसे पाठवणे, QR कोड स्कॅन करणे, व्यापाऱ्यांना पैसे देणे हे सर्व पूर्वीप्रमाणे सुरू राहील.

Important news for UPI users
UPI ची ताकद वाढली, आता गोल्ड लोन आणि FD चे पैसे थेट UPI ने काढता येणार, RBI चा मोठा निर्णय

निर्णयामागचे नेमकं काय कारण

NPCIच्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत यूपीआय फसवणुकीच्या लाखो घटना घडल्या आहेत. 'कलेक्ट रिक्वेस्ट' फिचरमुळे अनेकांना अनावधानाने पैसे गमवावे लागले. त्यामुळे, हा फिचर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यूपीआयवरील 'मनी रिक्वेस्ट' फिचर बंद झाल्याने थोडी असुविधा होईल, पण सुरक्षितता वाढेल. आता प्रत्येक व्यवहार स्वतःहून सुरू करावा लागेल, त्यामुळे फसवणुकीला आळा बसेल आणि यूपीआयवरील विश्वास अधिक मजबूत होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news