

भारत डिजिटल पेमेंटच्या जगात दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान आणत आहे. याच पार्श्वभूमीवर एका भारतीय स्टार्टअपने ThumbPay नावाचं अनोखं बायोमेट्रिक पेमेंट डिव्हाइस विकसित केलं आहे. याच्या मदतीने लोक फक्त अंगठ्याच्या ठशानेच पैसे व्यवहार करू शकतात.
आतापर्यंत पेमेंटसाठी कॅश, कार्ड, मोबाईल किंवा वॉलेटची आवश्यकता होती. मात्र आता फक्त अंगठा ठेवूनच व्यवहार पूर्ण होणार आहे. हे डिव्हाइस थेट आधार आणि UPI शी जोडलेले आहे.
ग्राहकाला या डिव्हाइसवर आपला अंगठा ठेवावा लागतो.
आधार-एनेबल्ड पेमेंट सिस्टमद्वारे (AEPS) व्यक्तीची ओळख पटते.
त्यानंतर थेट UPI च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होतात.
यात QR कोड स्कॅन करण्याची किंवा मोबाईल वापरण्याची गरज नाही.
काय आहेत डिव्हाइसची वैशिष्ट्ये
सर्टिफाइड फिंगरप्रिंट स्कॅनर – फसवणूक होण्याची शक्यता कमी.
लहान कॅमेरा आणि यूव्ही स्टरलायझेशन सिस्टम – स्वच्छता व सुरक्षिततेसाठी.
UPI साउंडबॉक्सप्रमाणे आवाज – व्यवहार पूर्ण झाल्यावर रक्कम सांगतो.
4G, Wi-Fi आणि LoRaWAN कनेक्टिव्हिटी – कमी नेटवर्क असलेल्या भागातही चालू शकतो.
बॅटरीवर चालणारे डिव्हाइस – वीज नसली तरी वापरता येईल.
या डिव्हाइसची किंमत 2,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे छोटे दुकानदार, ग्रामीण भागातील व्यापारी, दिहाडी मजूर किंवा ज्येष्ठ नागरिक सहज वापरू शकतील.
कंपनीने या डिव्हाइसचा पायलट टेस्ट पूर्ण केला आहे.
सध्या UIDAI आणि NPCI कडून मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मंजुरी मिळाल्यानंतर हे हळूहळू बाजारात आणले जाणार आहे.
स्मार्टफोन किंवा वॉलेट न वापरणारे लोक.
ग्रामीण भागातील लोक व ज्येष्ठ नागरिक.
दैनंदिन मजूर व छोटे व्यापारी.