Google Pay: हे पाच भन्नाट फिचर्स तुम्हाला माहितीये का? एकदा नक्की वापरून पहा

Google Pay Feature: केवळ ऑनलाईन पेमेंटसाठी आपण 'गुगल पे' चा वापरतो, पण त्याव्यतिरिक्त देखील असे काही भन्नाट फिचर्स देखील 'या' अ‍ॅपमध्ये लपलेले आहेत, चला तर पाहुया ते कोणते?
Google Pay Features
Gpay FeaturePudhari
Published on
Updated on

Google Pay Features Information in Marathi

पुढारी ऑनलाईन : गुगल पे हे अ‍ॅप भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्याला आपण GPay म्हणून देखील ओळखतो. UPI चा वापरून आपण पैसे पाठवू शकतो किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे प्राप्त करू शकतो, बिल भरूतो, मोबाईल रिचार्ज करू शकतो. हे अ‍ॅप वापरून आपण बरेच काही करण्याचा एक एक सोपा, जलद आणि सुरक्षित मार्ग देते.

बरेच GPay युजर्स यामधील मूलभूत वैशिष्ट्यांशी परिचित असले तरी गुगल पे मध्ये असे अनेक फिचर्स आहेत ते जाणून घेऊन तुम्ही तुमच्या डिजीटल ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत करू शकता. अशा काही गुगल पे टिप्स आणि युक्त्या आहेत ज्या वापरून पाहण्यासारख्या आहेत. चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या?...

Google Pay Features
Google Pay : ‘गुगल पे चा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय अनधिकृत’

Gpay Split Feature मित्रांसोबत पार्टीला जाताय? हे फिचर येईल कामी

'गुगल पे' वरून भरलेली बिले विभाजित करण्यासाठी आता तुम्हाला वेगळ्या अ‍ॅपची आवश्यकता नाही. कारण GPay मध्ये बिल्ट-इन (built-in) हे फिचर आहे. ते तुमचे कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींची बिले विभाजीत करू शकता. तुम्ही एक गट करू शकता. त्यामध्ये संबंधित लोकांना जोडू शकता. हे अ‍ॅप यामधील कोणी पैसे दिले आणि कोणी दिले नाहीत याचा मागोवा ठेवते. तुमच्या शेवटच्या ट्रिपमध्ये तुम्ही खर्च केलेल्या पैशांचा मागोवा घेणे सोपे करते.

असा करा प्रयत्न : नवीन पेमेंट > नवीन गट वर टॅप करा, सहभागी असलेल्या सर्वांना जोडा आणि विभाजित करायची रक्कम एंटर करा.

रिवॉर्डसाठी कार्ड स्क्रॅच करा

Google Pay वरील प्रत्येक पेमेंट तुम्हाला रिवॉर्ड देत नाही, परंतु काही व्यवहारांमुळे युनिक स्क्रॅच कार्ड अनलॉक होतात. विशेषतः जेव्हा तुम्ही फोन रिचार्ज किंवा वीज बिल यासारखे युटिलिटी पेमेंट करता तेव्हा. ही स्क्रॅच कार्डे अनेकदा भागीदार ब्रँडकडून कॅशबॅक किंवा उत्पादन सवलत कूपन देतात.

खास कार्डांसह, तुमचे सर्व स्क्रॅच कार्ड शोधण्यासाठी रिवॉर्ड्स विभाग तपासा.

Google Pay Features
मोबाईल हरवल्यास Google pay कसं डिलीट करावे ? जाणून घ्या या ६ स्टेप्समधून !

आवडत्या सबस्क्रिप्शनसाठी Autopay करा

Google Pay च्या ऑटोपे (Autopay) सुविधेमुळे Netflix, Spotify, YouTube Premium, JioCinema, Google One Cloud यांसारख्या आवडत्या सबस्क्रिप्शन्ससाठी पेमेंटची तारीख लक्षात ठेवण्याची गरज नाही. ही सुविधा UPI Autopay च्या माध्यमातून चालते, ज्यामुळे मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पेमेंट्स आपोआप होतात. Autopay रद्द करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे संबंधित सबस्क्रिप्शनचे पुढील पेमेंट आपोआप होणार नाही.

Google Pay अ‍ॅप उघडा > वरच्या उजव्या कोपऱ्यातील प्रोफाइल फोटोवर टॅप करा >‘Autopay’ पर्याय निवडा > ‘Pending’ टॅबमध्ये नवीन Autopay विनंती असेल, ती स्वीकारा > UPI पिन टाकून अधिकृत करा.

लॉग इन न करता बँक बॅलन्स तपासा (View Account Balance)

तुम्ही तुमच्या बँकिंग अ‍ॅप किंवा वेबसाइटवर लॉग इन न करता थेट Google Pay वरून तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातील बॅलन्स तपासू शकता. हे एक लहान वैशिष्ट्य आहे, परंतु जेव्हा तुम्हाला पेमेंट करण्यापूर्वी बँक खात्यावरील शिल्लक रक्कम चेक करायची असेल तेव्हा हे उपयुक्त आहे. पेमेंट पद्धती विभागातून तुमच्या बँक खात्यावर टॅप करा, नंतर खाते शिल्लक पहा (View Account Balance) निवडा. तुमचा UPI पिन एंटर करा आणि तुम्हाला त्वरित शिल्लक मिळेल.

Google Pay Features
Google Pay करताना वारंवार अडचणी येत आहेत ? ‘या’ आहेत सोप्या टिप्स, पैसे अडकणार नाहीत

GPay व्यवहारासंदर्भातील टीप जोडा (note)

Google Pay वापरून तुम्ही प्रत्येक पेमेंटसाठी एक वैयक्तिक टिप (note) किंवा लेबल जोडू शकता, ज्यामुळे तुम्हाला त्या व्यवहाराचा उद्देश लक्षात ठेवता येतो. हे बजेटिंग, कर भरणा, किंवा व्यवसायाच्या परतफेडींसाठी उपयुक्त ठरते. ही टिपणं तुमच्या व्यवहाराच्या इतिहासात दिसतील, ज्यामुळे भविष्यात त्या व्यवहाराचा संदर्भ समजायला सोपा होतो.

Google Pay अ‍ॅप उघडा > पेमेंट करताना, रक्कम टाकल्यानंतर, 'Add note' किंवा 'नोट जोडा' हा पर्याय दिसेल > तुम्हाला हवे असलेले टिपण लिहा — उदाहरणार्थ, 'भाडे', 'डिनर', 'उधार', किंवा फक्त एक इमोजी (जसे की 🍕). पेमेंट पूर्ण करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news