

Second Hand Car Price :
भारत सरकारनं वस्तू आणि सेवा करात मोठे बदल केले आहेत. हे बदल येत्या २२ सप्टेंबर पासून लागू होणार आहेत. त्यामुळं गाड्यांच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहेत. अनेक कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या नव्या गाड्यांचे सुधारित दर जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. अनेक गाड्यांवर तर लाखो रूपयांचा फायदा ग्राहकांना होणार आहे. विशेष म्हणजे फक्त नव्या गाड्यांच्याच किंमती कमी होणार नाहीत तर जुन्या गाड्या देखील स्वस्त होत आहेत. काही काही मॉडेलच्या सेकंड हँड गाड्यांच्या किंमती लाखो रूपयांनी कमी होणार आहेत.
देशातील प्रमुख प्री ओन्ड कार व्यावसायिक कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर जुन्या गाड्या खरेदीवर सूट जाहीर केली आहे. स्पिनी आणि कार्स २४ सारख्या ब्रँड्सनी देखील ही ऑफर जाहीर केली आहे. देशभरात आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. त्याचं औचित्य साधून जुन्या गाड्या विकणाऱ्या कंपन्यांनी भरपूर सूट दिली आहे.
स्पिनी या सेकंड हँड कार विकणाऱ्या कंपनीने जरी जुन्या गाड्यांच्या जीएसटी स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल केला नसला तरी चांगली ऑफर दिली आहे. कंपनीनं लिस्टेड किंमतीवर जास्तीजास्त २ लाखापर्यंतची सूट दिली आहे. मात्र यात एक मोठी मेख आहे. ही ऑफर जीएसटीचे नवे दर लागू होण्यापूर्वीपर्यंतच म्हणजे २२ सप्टेंबर पर्यंतच असणार आहे.
दुसरीकडं आपली जुनी गाडी विकणाऱ्यांना देखील फायदा होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार चांगली मागणी आणि रिसेल व्हॅल्यूमुळं प्रती कार २० हजारांपर्यंतचा लाभ होणार आहे.
प्री ओन्ड कार प्लॅटफॉर्म कार्स २४ ने आपले नवे कॅम्पेन लाँच केलं आहे. त्याद्वारे ग्राहकांना जीएसटी रिलीफचा थेट लाभ देण्यात येणार आहे. कंपनीने सांगितलं की आता कार्स २४ मध्ये उपलब्ध असलेल्या जुन्या गाड्यांवर जास्तीजास्त ८० हजार रूपये ऑफर मिळणार आहे.
कंपनीनं सांगितलं की मारुती सुझुकी स्विफ्ट, हुंडाई आय २०, होंडा सिटी, टाटा नेक्सॉन, हुंडाई क्रेटा आणि किया सेल्टॉस या सारख्या ब्रँड्सच्या किंमती कमी होणार आहेत.