Share Market : आठवड्या भराच्या तेजीनंतर आज अचानक शेअर मार्केट कोसळलं; अदानींचे स्टॉक्स मात्र....

गेल्या आठवड्या तेजीत असणारं भारतीय शेअर मार्केट आज अचानक कोसळलं. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये घसरण झाली आहे.
share market
share market File Photo
Published on
Updated on

Share Market Update :

गेल्या आठवड्या तेजीत असणारं भारतीय शेअर मार्केट आज अचानक कोसळलं. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये घसरण झाली आहे. मात्र अदानींचे शेअर्स चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. आज (दि१९) अदानी शेअर्सने मार्केटमध्ये चांगली कामगिरी केली. सेबीने हिंडनबर्ग प्रकरणात अदानी ग्रुपला क्लीन चीट दिल्यानंतर त्यांचा फायदा शेअर मार्केटमध्ये दिसत आहे.

आठवडाभर तेजीत चाललेलं शेअर मार्केट आज शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरलं सेंन्सेक्स ४०० अंकांनी तर निफ्टी १०० अंकांनी कोसळलं. सेन्सेक्स सध्या ८२ हाजर ६१२ वर आहे तर निफ्टी २५ हजार ३२० अंकांवर आहे. निफ्टी बँकमध्ये देखील घसरण पहावयास मिळत आहे. इथं जवळपास १५० अंकांची घसरण झाली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या टॉप ३० शेअर्समधील फक्त ७ शेअर्सच तेजीत आहेत. यात अदानी पोर्ट सर्वात आघाडीवर आहे. तर २३ शेअर्समध्ये किरकोळ घरसण झाली आहे. टीसीएसमध्ये एक टक्क्याची घट झाली आहे.

शेअर मार्केटमध्ये का झाली घसरण?

शेअर मार्केटमध्ये झालेली ही घसरण लार्ज कॅप शेअर्सच्या खराब कामगिरीमुळं आल्याचा अभ्यासकांचा दावा आहे. गेल्या आठवडाभर मार्केट तेजीत होतं. त्यामुळं या शेअर्समध्ये विक्रीचा ट्रेंड दिसला. त्याचबरोबर अमेरिकेसोबतच्या टेरिफ आणि ट्रेड डील वर अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. अमेरिकेच्या केंद्रीय बँकांद्वारा देखील फेड रेटमध्ये घट करण्यात आली आहे. त्यामुळं देखील भारतीय शेअर बाजारावर दबाव आला आहे.

कोणत्या शेअर्सना बसला फटका?

झायडस वेलनेस, डीएसएम श्रीराम, जेन टेक्‍नोलॉजी यांचे शेअर्स २ टक्क्यांपेक्षा जास्तने पडले आहेत. त्याचबरोबर आयसीआयसीआय, इंडिया मार्ट, मोनट सॉफ्टवेअर या शेअर्समध्ये देखील पडझड झाली आहे.

अदानी का आहेत तेजीत?

अदानी पॉवरचे शेअर्स ७ टक्क्यांनी वाढून ६७५ पर्यंत पोहचले आहेत. तर अदानी इंटरप्राईजेसचे शेअर जवळपास ४ टक्क्यांनी वाढले आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन ३, अदानी पोर्ट २ टक्क्यांनी वाढले आहेत. तर अदानी ग्रीन एनर्जी देखील तेजीत आहे.

गुरूवारी शेअर मार्केट बंद झाल्यावर सेबीनं अदानी ग्रुपला हिंडनबर्ग प्रकरणी क्लीन चीट दिल्याचं वृत्त आलं. त्यानंतर आज मार्केट उघडल्यावर अदानी ग्रुपचे सर्व स्टॉक्स हे तेजीत आहेत. ज्यावेळी हिंडनबर्गने अदानींविरूद्ध गंभीर आरोप केले होते त्यावेळी त्यांच्या शेअर्सची किंमत मोठ्या संख्येनं खाली कोसळली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news