

चीनची मोबाईल कंपनी Poco ने आपला नवीन फोन Poco F7 5G भारतात लाँच केला आहे. हा फोन जगभरात आणि भारतात एकाच वेळी आणला गेला असून, 1 जुलैपासून तो Flipkart वर विकत घेता येईल.
Poco F7 5G हा एक चांगल्या क्वालिटीचा पण बजेटमध्ये बसणारा फोन आहे, ज्यात एकदम नवीन फीचर्स आणि भन्नाट स्पीड देणाऱ्या गोष्टी आहेत. कंपनीने यात मोठी बॅटरी, सुपर AMOLED डिस्प्ले, नवीन प्रोसेसर आणि एक भारी कॅमेरा दिला आहे.
या फोनची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यात दिलेली 7,550 mAh ची मोठी बॅटरी, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय, यात 22.5W रिव्हर्स चार्जिंगची सोय आहे, ज्यामुळे तुम्ही दुसरे मोबाईल किंवा डिव्हाइस चार्ज करू शकता.
फोनमध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर आहे. यात 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज दिलं आहे. त्यामुळे गेमिंग, एकाच वेळी खूप अॅप्स वापरणं किंवा जड अॅप्स चालवण्यासाठी हा फोन एकदम मस्त आहे.
फोनमध्ये ६.८३ इंचाचा 1.5K pOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,200 निट्स ब्राईटनेस देतो. यावर स्क्रीनला ओरखडे आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी Corning Gorilla Glass 7i चं प्रोटेक्शन दिलं आहे.
मागचा कॅमेरा (दोन कॅमेरे):
50MP मुख्य कॅमेरा
8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा
सेल्फी कॅमेरा:
20MP फ्रंट कॅमेरा हे कॅमेरे फोटो आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी चांगली क्वालिटी देतात.
फोनमध्ये Android 15 वर चालणारं HyperOS 2.0 दिलं आहे. या नवीन ऑपरेटिंग सिस्टममुळे फोन वापरायला सोपा, वेगवान आणि त्यात चांगले अॅनिमेशन्स पण मिळतात.
सायबर सिल्व्हर
फ्रॉस्ट व्हाईट
फँटम ब्लॅक
12GB रॅम + 256GB स्टोरेज – ₹35,999
12GB रॅम + 512GB स्टोरेज – ₹37,999
विक्रीची तारीख: १ जुलै २०२५ पासून Flipkart वर सेल सुरू होईल.
ज्या लोकांना गेमिंग, एकाच वेळी अनेक कामं करणं, जास्त वेळ चालणारी बॅटरी आणि चांगला कॅमेरा हवा आहे, तोही बजेटमध्ये, त्यांच्यासाठी Poco F7 5G हा एक उत्तम पर्याय आहे. याचं डिझाइन आणि पॉवरफुल प्रोसेसरमुळे हा फोन इतर कंपन्यांच्या तुलनेत एक पैसा वसूल फोन आहे.