shreya kulkarni
मशीनमध्ये दिलेले किलो म्हणजे त्या मशीनमध्ये किती "सुके कपडे" धुवता येतील, हे दाखवते. उदा. 7 Kg मशीनमध्ये 7 किलो वजनाचे सुके कपडे.
ही क्षमता कपडे धुण्यापूर्वीच्या वजनावर आधारित असते. गीले झालेले किंवा पाण्यात भिजलेले वजन नव्हे.
7 किलो मशीनमध्ये २ जीन्स, ३ शर्ट, काही इनरवेअर आणि एक टॉवेल सहज धुवता येतो. पण कपड्यांचे फॅब्रिक हे महत्त्वाचे असते.
जास्त कपडे घातल्यास मोटरवर ताण येतो, मशीन हॅंग होते किंवा कपडे नीट धुतले जात नाहीत.
मशीन क्षमतेपेक्षा खूपच कमी कपडे टाकल्यास पाणी आणि वीज यांचा अपव्यय होतो.
ड्रम ३ भागांत भरावा – एक कपडे, एक हवा आणि एक पाणी व डिटर्जंटसाठी. यामुळे धुलाई उत्तम होते.
लहान कुटुंबासाठी ६–७ Kg पुरेसे आहे, तर मोठ्या कुटुंबासाठी ८–१० Kg ची मशीन योग्य.
7 किलो मशीनचा अर्थ परफॉर्मन्स कमी आहे असं नव्हे. ती तुमच्या गरजेनुसार निवडायची आहे.