

Apple च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कंपनी आपल्या बहुप्रतिक्षित आयफोन 17 सीरिजवर काम करत असून, यातील सर्वात प्रीमियम मॉडेल असलेल्या आयफोन १७ प्रो (iPhone 17 Pro) बाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती लाँचपूर्वीच लीक झाली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये लाँच होणाऱ्या या फोनची संभाव्य किंमत, डिझाईन आणि दमदार फीचर्सनी टेक्नॉलॉजी क्षेत्रात मोठा धुमाकुळ घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन 17 प्रो च्या डिझाईनमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे त्रिकोणी रचनेत बसवलेले असतील. हे डिझाईन फोनला एक नवा आणि आकर्षक लूक देईल. प्रसिद्ध लीकस्टर ‘माजिन बू’ यांच्या मते, हा फोन ‘स्काय ब्लू’ या नव्या रंगात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आयफोन 17 प्रो कॅमेऱ्याच्या बाबतीत एक ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. या फोनमध्ये मागील बाजूस तब्बल तीन ४८ मेगापिक्सेलचे कॅमेरे दिले जातील, ज्यात अल्ट्रा-वाइड, फ्यूजन आणि टेलीफोटो लेन्सचा समावेश असेल.
सर्वात मोठा बदल सेल्फी कॅमेऱ्यात होणार आहे. आयफोन 16 प्रो मधील 12 मेगापिक्सेलच्या तुलनेत, आयफोन 17 प्रो मध्ये २४ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे, ज्यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा कैकपटीने सुधारेल.
हा फोन Apple च्या नव्या A19 प्रोसेसर सह येईल, जो २ नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवर आधारित असेल. यामुळे फोनचा वेग प्रचंड वाढेल आणि बॅटरी लाईफही सुधारेल. मल्टीटास्किंग आणि हाय-एंड गेमिंगसाठी यात 12 जीबी रॅम दिली जाईल. विशेष म्हणजे, फोन जास्त वापरामुळे गरम होऊ नये, यासाठी ‘वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम’ सारखे प्रगत फीचरही यात दिले जाणार आहे.
Apple ने अधिकृत घोषणा केली नसली तरी, लीक झालेल्या माहितीनुसार आयफोन 17 प्रो भारतात सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होईल. याच्या सुरुवातीच्या मॉडेलची किंमत ₹1,39,900 असू शकते. स्टोरेजच्या पर्यायांनुसार ही किंमत वाढेल.
एकंदरीत, आयफोन 17 प्रो हा आतापर्यंतचा सर्वात प्रगत आयफोन ठरण्याची शक्यता आहे. याची किंमत प्रीमियम असली तरी, यात मिळणारे अत्याधुनिक फीचर्स पाहता जगभरातील ग्राहक या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत.