

मुंबई : डिजिटल व्यवहार वाढले असतानाच, गोपनीयतेसाठी नवीन तंत्रज्ञानाची गरजही वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर Paytm ने एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. आता युजर्स आपल्या निवडक ट्रान्सेक्शन हिस्ट्री अॅपमध्येच लपवू शकतात, म्हणजेच कोणते व्यवहार इतरांपासून लपवायचे हे तुम्हीच ठरवू शकता. नवीन ‘Hide Payment’ फीचर खासकरून त्यांच्यासाठी आहे, ज्यांना आर्थिक गोपनीयता हवी असते मग ते वैयक्तिक खर्च असो, गिफ्ट व्यवहार असो किंवा इतर काही.
पेटीएमचे हे नवीन फीचर युजर्सना त्यांच्या व्यवहारांवर अधिक नियंत्रण देते. एकदा व्यवहार लपवला की, तो अॅपच्या Transaction History मध्ये दिसणार नाही. पुनः पाहण्यासाठी पासवर्ड किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन गरजेचं असतं, ज्यामुळे गोपनीयता अधिक मजबूत होते. यामुळे तुमचे व्यवहार कोणाच्या नजरेसही न पडता सहज व्यवस्थापित होऊ शकतात.
Paytm अॅप उघडा आणि Balance & History वर जा.
लपवायचा व्यवहार डावीकडे स्वाइप करा.
‘Hide’ या पर्यायावर टॅप करा.
पुष्टीकरणासाठी ‘Yes’ करा आणि झाले!
पुन्हा व्यवहार पाहण्यासाठी “View Hidden Payments” वर जा आणि तुमचा PIN किंवा फिंगरप्रिंट वापरून अनलॉक करा.
Paytm केवळ हेच नव्हे, तर आणखी काही उपयुक्त अपडेट्स घेऊन आलं आहे:
QR विजेटमुळे आता पेमेंट स्कॅनिंग अधिक वेगवान.
थेट अॅपमधून UPI शिल्लक तपासता येते.
सर्व व्यवहार PDF किंवा Excel स्वरूपात डाउनलोड करता येतात.
हे सर्व बदल युजर्सच्या सोयीसाठी आणि डेटा गोपनीयतेसाठी केले गेले आहेत. ‘Hide Payment’ हे त्यातीलच एक महत्त्वाचं पाऊल आहे. जे डिजिटल युगात खाजगीपणाला प्राधान्य देणाऱ्यांसाठी वरदान ठरू शकतं.